मुजफ्फरनगर - ८ ऑक्टोबर २०२५ च्या सकाळी मुजफ्फरनगरच्या खुड्डा गावात राहणारे शराफत अली टेन्शनमध्ये पोलीस ठाण्यात पोहचले होते. त्यांचा मुलगा शोएब बेपत्ता झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोएबचा शोध सुरू केला. जवळपास १० दिवसांनी १७ ऑक्टोबरच्या रात्री शोएबचा मृतदेह पोलिसांना सहारनपूर जिल्ह्यात विहारीगड येथे सापडला. ज्या कारमधून शोएब घरी निघाला होता, ती कारही जळालेल्या अवस्थेत होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता शोएबची हत्या झाल्याचं समोर आले. त्यानंतर शोएबच्या गुन्हेगारांचा शोध करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली.
हत्येचा मागोवा सुरू झाला त्यानंतर एकापाठोपाठ एक धागेदोरे जोडत गेले. त्यातून शोएबचा खून अन्य कुणी नाही तर त्याच्याच शेजारी राहणाऱ्या मुन्नवर अलीने केल्याचे समोर आले. हाच मुन्नवर अली शोएबच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासोबत शोकात बुडाला होता. त्याने शोएबला शोधण्याचे नाटकही केले. मुन्नवरची चौकशी केली तेव्हा हत्येमागील कहाणी सगळ्यांनाच हैराण करणारी होती. ज्यात खूनाचे कनेक्शन सौदी अरेबियातून आणलेल्या १५० ग्रॅम सोन्याशी जोडलेले होते. याच सोन्यासाठी मुन्नवरने सुपारी देत शोएबची हत्या केली.
मुन्नवर मागील १५ वर्षापासून सौदी अरेबियात राहत होता. तो सोन्याची तस्करी करायचा. जवळपास दीड वर्षापूर्वी शोएब त्याच्या नेटवर्कचा भाग बनला आणि सोन्याची तस्करी करू लागला. मागील अडीच वर्षात शोएब ६ वेळा परदेशात जाऊन आला. त्यातच ६ महिन्यापूर्वी मुन्नवर पुन्हा भारतात परतला. काही महिन्यांपूर्वी शोएबला सौदी अरेबियातून ३०० ग्रॅम सोने तस्करी करण्याचं काम मिळाले. ज्यातून १५०-१५० करून २ वेगवेगळ्या मोबाईल चार्जरमधून हे सोने लपवून भारतात आणले गेले. शोएबने केवळ १५० ग्रॅम सोने सांगितलेल्या व्यक्तीकडे सोपवले आणि दुसरा चार्जर एअरपोर्टवर पकडल्याचे सांगितले. त्याच रागातून मुन्नवरने शोएबचा काटा काढण्याचे ठरवले.
२ महिन्यापासून मुन्नवर शोएबच्या हत्येचे प्लॅनिंग करत होता. त्याने २ जणांना सुपारी दिली. ७ ऑक्टोबरला देहारादूनला फिरण्याचा प्लॅन बनवला. रस्त्यात मुन्नवर आणि अंकित त्याच्या कारमध्ये बसले. कारमध्ये या दोघांनी शोएबला भरपूर दारू पाजली. शोएब दारूच्या नशेत असताना अंकितने बाइकच्या क्लच तारेने त्याचा गळा दाबला. त्यानंतर मुन्नवरने शोएबच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात शोएबचा तडफडत तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर निर्जन जंगलात या दोघांनी मिळून शोएबच्या कारला आग लावली. त्यात शोएबचा मृतदेह होता. शोएबची हत्या आणि कार जाळण्याच्या या प्लॅनिंगमध्ये एकूण ६ जण सहभागी होते. त्यानंतर मुन्नवर घरी परतला आणि शोएबच्या कुटुंबासोबत मिळून त्याचा शोध घेण्याचं नाटक करू लागला. परंतु त्याचा हा प्लॅन पोलीस तपासात उघड झाला. पोलिसांनी शोएबच्या हत्या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली आहे तर एक जण फरार आहे.
Web Summary : A youth's murder was solved after gold hidden in a mobile charger was discovered as the motive. A neighbor orchestrated the killing over a dispute involving smuggled gold from Saudi Arabia. The victim was betrayed and killed by associates.
Web Summary : मोबाइल चार्जर में छुपा सोना एक युवक की हत्या का कारण बना, मामले का खुलासा। सऊदी अरब से तस्करी किए गए सोने के विवाद में एक पड़ोसी ने हत्या की साजिश रची। पीड़ित को साथियों ने धोखा देकर मार डाला।