शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

फोनवरच्या भांडणातून प्रेयसीने बिहारमध्ये केली आत्महत्या, तिकडे जयपूरमध्ये प्रियकराने बिल्डींगहून मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:39 IST

Bihar Couple Suicide : मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं.

(Image Credit : Aajtak)

बिहारमध्ये (Bihar) बालपणीच्या प्रेमाच गुरूवारी दुःखद अंत (Bihar Couple Suicide) झाला. छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वाद होत असल्याने प्रियकराने मोबाइल फोन स्वीच ऑफ केला म्हणून प्रेयसीने मुजफ्फरपूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तिच्या मृत्यूची बातमी ऐकून प्रियकराने जयपूरमध्ये एका बिल्डींगच्या ८ व्या मजल्याहून उडी मारत जीव दिला.

ही धक्कादायक घटना मुजफ्फरपूरच्य अंजली आणि विवेकसोबत घडली. मुजफ्फपूरच्या काजी मोहम्मदपूरमध्ये राहणारी २३ वर्षीय अंजली जयस्वालचं २६ वर्षीय विवेक कुमारसोबत ८व्य वर्गापासून अफेअर सुरू होतं. दोघेही शाळेत एकत्र शिकत होते. दोघेही आपल्या विश्वात आनंदी होते.

यादरम्यान ४ वर्षाआधी विवेक इंजिनिअरींग करण्यासाठी जयपूरला गेला. त्यामुळे दोघेही फोनवर सतत बोलत होते. अंजील सीएची तयारी करत होती. दोघांमध्ये नेहमीच भांडणही होत होतं. अलिकडे त्यांची भांडणं वाढली होती. बुधवारी रात्रीही एक मैत्रीण त्यांचं नातं ठीक करण्याचा प्रयत्न करत होती.

रात्री तिघांचा कॉन्फरन्स कॉल सुरू होता. तेव्हाच पुन्हा दोघांमध्ये भांडण झालं. रागाच्या भरात विवेकने फोन कट केला. अंजली त्याला पुन्हा पुन्हा फोन लावत होती. त्यामुळे त्यांनी फोन स्वीच ऑफ केला. सकाळी त्याला प्रेयसीच्या मृत्यूची बातमी मिळाली. यानंतर गुरूवारी दुपारी विवेकने बिल्डींगहू उडी घेत आपलाही जीव दिला. 

प्रियकर विवेकच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूनंतर दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्थातच कुटुंबियांना धक्का बसला आहे. विवेकचे काका म्हणाले की, आम्हाला तीन वर्षापासून त्यांच्या नात्याबाबत माहिती होती. अशात हे असं काही घडेल याचा अंदाज नव्हता. त्याने एकदा जरी सांगितलं असतं तर आम्ही अंजलीला आनंदाने सून म्हणून घरात आणलं असतं. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी