मेरठच्या सौरभ हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सौरभची पत्नी मुस्कानने बॉयफ्रेंड साहिलसह सौरभची हत्या केल्याचा आरोप आहे. पण आता आणखी एक नवा खुलासा झाला आहे की, मुस्कानचं साहिल नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीवर खूप प्रेम होतं आणि ती त्या व्यक्तीचा खूप आदर करायची. मुस्कानची आई कविता रस्तोगीने याबाबतचं सत्य सांगितलं आहे.
आईच्या मते, मुस्कानचं तिच्या मावशीवर सर्वात जास्त प्रेम होतं, जी आता या जगात नाही. आईचा दावा आहे की, मावशीच्या मृत्यूनंतर मुस्कान मानसिकदृष्ट्या खचली होती. ती मावशीला स्वतःची आई मानत असे. म्हणूनच ती माझी आई सावत्र आई आहे असं म्हणायची. सौरभच्या कुटुंबाने या हत्येसाठी मुस्कान आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरलं आहे.
मुस्कानच्या पालकांनी मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मुस्कानचे वडील म्हणतात की, त्यांनी एकही पैसे घेतले नाहीत. त्यांच्या मते, जर सौरभने पैसे दिले असते तर ते फक्त बँक खात्यातूनच दिले असते, ज्याची चौकशी केली जाऊ शकते. जुनं घर विकून नवीन घर खरेदी केलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही असंही म्हटलं आहे.
सौरभ राजपूतची 'ही' छोटीशी चूक ठरली त्याच्या मृत्यूचं कारण; मुस्कानच्या आईचा मोठा खुलासा
मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे. सौरभची एक छोटीशी चूक त्याच्याच मृत्यूचं कारण बनली असं म्हटलं आहे. मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "आम्ही लग्नापूर्वी कधीही मुस्कानला फोन दिला नाही. पण लग्नानंतर सौरभने स्वतः तिला फोन वापरण्याची परवानगी दिली. सौरभनेच मुस्कानला साहिलशी बोलण्याची परवानगी दिली होती कारण ते दोघेही वर्गमित्र होते. पण ही छोटीशी चूक नंतर त्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण बनली."