शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सात चोऱ्या करीत रक्षकावर खुनी हल्ला; आरोपी ताब्यात, दोघेही अल्पवयीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 00:35 IST

चितळसर, मानपाडा येथील जयभवानीनगर भागात राहणाऱ्या या दोघांनी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील एका रिक्षा चालकाकडून मोबाइल आणि काही रोकड जबरीने हिसकावून मोटारसायकलीवरून पलायन केले.

ठाणे: एकाच रात्रीत सात जबरी चोऱ्या करीत सुरक्षारक्षकावर चाकूचे वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलांना चितळसर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाइल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी गुरुवारी दिली.चितळसर, मानपाडा येथील जयभवानीनगर भागात राहणाऱ्या या दोघांनी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मानपाडा येथील एका रिक्षा चालकाकडून मोबाइल आणि काही रोकड जबरीने हिसकावून मोटारसायकलीवरून पलायन केले. त्यानंतर पुन्हा एक तासाच्या अंतराने त्याच भागातील शुभारंभ सोसायटीमधील एका सुरक्षारक्षकाकडून मोबाइल आणि रोकड हिसकावून पळ काढला. तिसऱ्या घटनेमध्ये १८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एका रिक्षा चालकाकडून ४५० रुपयांची रोकड लुबाडली. पुढे मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील एका घराची खिडकी उचकटत असताना त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या छातीवर आणि पोटावर त्यांनी चाकूने वार केला. त्याच काळात त्यांनी वर्तकनगर भागात दोन आणि नौपाडा भागातील एका ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार केला. एकाच रात्रीमध्ये अवघ्या काही तासांच्या अंतराने ही लुटमार सुरू असल्याची माहिती चितळसर पोलिसांना ठाणे नियंत्रण कक्षातून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना लगेचच ताब्यात घेतले.मुद्देमाल हस्तगत -वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात मोबाइल, मोटारसायकल आणि दोन सुरे असा एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेThiefचोरtheftचोरीRobberyचोरीPolice Stationपोलीस ठाणे