शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

डोळे काढून बघितले म्हणून केला खून : नागपुरातील पिपळा मार्गावर थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 7:59 PM

क्षुल्लक कारणावरून दोघांनी एका सरळसाध्या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी रात्री ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देपोलिसांनी केली आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून दोघांनी एका सरळसाध्या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. रवींद्र राधेश्याम भोंगाडे (वय २२) असे मृताचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिपळा मार्गावरील सिद्धेश्वरी नगरात राहत होता. शुक्रवारी रात्री ही थरारक घटना घडली. दिलीप हिरालाल उईके आणि अंकित भोसले अशी आरोपींची नावे आहेत. ते पिपळा मार्गावरच राहतात.मृत भोंगाडे हा अत्यंत सरळमार्गी आणि कुणाच्याही कामात धावून जाणारा होता. तो त्याचे वडील आणि भाऊ गवंडी काम करायचे. तो राहत असलेल्या पिपळा मार्गावर एकाचे शुक्रवारी निधन झाले. त्याच्याकडे दरी आणि पडदा पाहिजे होता तो आणण्यासाठी भोंगाडे डेकोरेशनवाल्याकडे जात होता. रस्त्यात असलेल्या फ्रेण्डस पान सेंटरवर रात्री ७ च्या सुमारास तो थांबला. त्याचवेळी तेथे आरोपी उईके आणि भोसले आले. ते दारूच्या नशेत टुन्न होते. त्यांची आणि भोंगाडेची नजरानजर झाली. आमच्याकडे डोळे काढून का बघतो, असे विचारत आरोपी उईके आणि भोसलेने भोंगाडेला शिवीगाळ केली. कारण नसताना का शिवीगाळ करतो, अशी विचारणा केल्यामुळे भोंगाडेला आरोपींनी मारहाण केली. त्यामुळे भोंगाडेनेही एक थापड एका आरोपीला मारली. त्यानंतर ‘निकाल रे सामान’ म्हणत आरोपींनी धारदार चाकू काढून भोंगाडेच्या पोटावर, छातीवर भोसकून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. तो ठार झाला असे समजून शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. परिसरातील नागरिकांनी भोंगाडेला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये भरती केले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, माहिती कळताच हुडकेश्वर पोलीस पोहचले. रवींद्रचे वडील राधेश्याम हिरालाल भोंगाडे (वय ४६) यांची तक्रार नोंदवून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार राजकमल वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ करीत शनिवारी दोन्ही आरोपींना अटक केली.परिसरात शोकसंतप्त वातावरणसरळमार्गी स्वभागाच्या रवींद्र भोंगाडेची हत्या झाल्याचे कळताच परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांनी कोणताही वाद नसताना किंवा कारण नसताना केवळ डोळे काढून का बघतो, असे विचारत रवींद्रला मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याची हत्याही केली. त्यामुळे परिसरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून