शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काळेवाडीत किरकोळ कारणावरून तरुणाचा खून; सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:01 IST

कोयत्याने वार करून काळेवाडी येथील तापकीर चौकात करण्यात आली होती हत्या.

ठळक मुद्देपाच संशयित आरोपींना चार दिवसांची कोठडी

पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून केला. काळेवाडी येथील तापकीर चौक येथे धोंडिराज मंगल कार्यालयात बुधवारी (दि. १९) रात्री साडेआठ ते सव्वानऊच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना पोलिसांनीअटक केली. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. . शुभम जनार्दन नखाते (वय २२, रा. नखातेनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय २३, रा. तापकीर चौक, काळेवाडी), प्रवीण ज्योतिराम धुमाळ (वय २१), अविनाश धनराज भंडारी (वय २३), मोरेश्वर रमेश आष्टे (वय २१), अजय भारत वाकोडे (वय २३, सर्व रा. तापकीर नगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राज तापकीर व प्रेम वाघमारे यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत शुभम याचे वडील जनार्दन आत्माराम नखाते (वय ५२, रा. नखातेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व आरोपी ज्ञानेश्वर पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. ते भांडण मिटविण्याच्या बहाण्याने आरोपी यांनी कट रचून शुभम याला बोलावून घेतले. त्यानुसार शुभम बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास धोंडिराज मंगल कार्यालयात गेला. त्यावेळी आरोपी यांनी शुभम याच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने वार करून शुभम याला जिवे ठार मारले.शुभम याच्या विरोधात विनयभंग, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच संशयितांपैकी काही आरोपींवर देखील गुन्हे दाखल आहेत. शुभम याच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानुसार वाकड पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पाच आरोपींना  अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता रविवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMurderखूनArrestअटकPoliceपोलिस