खराबवाडीत वादातून तरुणाचा खून, सात जणांनी केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:40 IST2019-02-09T00:39:48+5:302019-02-09T00:40:19+5:30

एक महिन्यापूर्वी कॉलेज गॅदरिंगमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे कारणावरून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

The murder of the youth by murder, seven people have been attacked | खराबवाडीत वादातून तरुणाचा खून, सात जणांनी केला हल्ला

खराबवाडीत वादातून तरुणाचा खून, सात जणांनी केला हल्ला

चाकण - एक महिन्यापूर्वी कॉलेज गॅदरिंगमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे कारणावरून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. चाकणजवळील खराबवाडी येथे घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
प्रशांत धर्मनाथ बिरदवडे (वय १९ रा. राणूबाईमळा, चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून पियुष धाडगे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एक महिन्यापूर्वी कॉलेज गॅदरिंग मध्ये झालेल्या किरकोळ वादावादी नंतर आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराबवाडी ( ता.खेड ) येथील चौधरी ढाब्या समोर सात जणांच्या अज्ञात टोळक्याने प्रशांत याच्या वर लोखंडी गज व कोयत्याने वार केले.
यामध्ये प्रशांत हा जागीच ठार झाला, तर पियुष हा जखमी झाला असून पियुष वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून कोणालाही ताब्यात घेतले नाही, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा
केला आहे.

Web Title: The murder of the youth by murder, seven people have been attacked