शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! आईला मारल्याने धाकट्या भावाने केली थाेरल्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:05 IST

Murder Case : आराेपी अटकेत : माैदी येथील घटना

ठळक मुद्देकृष्णा बाबुराव मसराम (३८, रा. चारगाव (माैदी, ता. रामटेक) असे मृताचे नाव असून, प्रमाेद बाबुलाल मसराम (३६) असे आराेपीचे नाव आहे.

नागपूर (देवलापार) : आईला मारहाण केल्यावरून रागाच्या भरात धाकट्या भावाने थाेरल्या भावावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदी येथे बुधवारी (दि. १४) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेच्या चार तासातच पाेलिसांनी आराेपीला अटक केली.

कृष्णा बाबुराव मसराम (३८, रा. चारगाव (माैदी, ता. रामटेक) असे मृताचे नाव असून, प्रमाेद बाबुलाल मसराम (३६) असे आराेपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आराेपी प्रमाेदसह आणखी दाेन नातेवाईक आराेपी असून, त्यात अतुल कृष्णा तुराम व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा (रा. खसाळा, नागपूर) समावेश असण्याची शक्यता पाेलीस सूत्रांनी वर्तविली आहे. मृत कृष्णा मसराम हा मूळचा चारगाव येथील रहिवासी असून तो माैदी येथे त्याच्या घरकुलात राहात हाेता. त्याच्यासाेबत आराेपी प्रमाेदसुद्धा राहायचा. मात्र दाेघांमध्ये नेहमी वादविवाद हाेत असल्याने ता. खसाळा येथे राहू लागला.मंगळवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास कृष्णा त्याचे आईवडील राहत असलेल्या चारगाव येथे गेला व त्याने आई दसवंती यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा पाय फॅक्चर झाल्याचे समजते. ही बाब कळताच प्रमाेद हा लगेच चारगावला पाेहाेचला. नातेवाईकांच्या मदतीने दसवंतीला प्रथम खासगी दवाखान्यात व नंतर देवलापार ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने तिला डाॅक्टरांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास नागपूर येथील मेडिकलमध्ये हलविले. अशात आराेपी प्रमाेदने माैदीवरून आधारकार्ड घेऊन येताे, असे सांगून आईसाेबत रुग्णवाहिकेत न जाता थेट माैदी येथे गेला. त्यावेळी कृष्णा घरी हाेता. प्रमाेदने घरात शिरून रागाच्या भरात धारदार शस्त्राने कृष्णावर वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा प्रकार कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच आराेपी प्रमाेद आईजवळ निघून गेला.

दरम्यान, मृत कृष्णा रक्ताच्या थाराेळ्यात पडून असल्याचे काहींच्या लक्षात येताच माैदी येथील पाेलीस पाटलांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. दरम्यान, आराेपी प्रमाेद हा नागपूर मेडिकलमध्ये असल्याची माहिती मिळताच ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी पाेलीस उपनिरीक्षक केशव कुंजरवाड यांच्या नेतृत्वात पाेलीस पथक नागपूरला रवाना केले. तिथे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आराेपीस अटक केली. या गुन्ह्यात आराेपीने आणखी दाेन साथीदाराची नावे पुढे केली असून, देवलापार पाेलीस त्याचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटक