शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मित्राची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 19:13 IST

फिर्यादी आणि त्यांच्या आईने आरोपींना तुम्ही आरतीमध्ये येऊन का गोंधळ घातला, अशी विचारणा केली

ठळक मुद्देवाल्हेकरवाडीतील घटना : १४ आरोपींविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : मित्राची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. वाल्हेकरवाडी येथे शनिवारी (दि. ५) ही घटना घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अमित सुभाष पोटे (वय २७, रा. वाल्हेकरवाडी, चिचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुरज दिलीप जगताप (वय २५, रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयूर लोखंडे (वय २५, रा. दत्तवाडी आकुर्डी), पंकज जगताप (वय २५, रा. वाल्हेकरवाडी), किशोर इंगळे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी) आणि जैद मुजावर (वय २६, रा. वाल्हेकरवाडी) यांच्यासह एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजावर आणि फिर्यादी यांच्यात पूर्ववैमनस्य होते. शनिवारी रात्री फिर्यादी जगताप यांच्या घरी देवीची आरती सुरू होती. त्यावेळी सर्व आरोपी टोळक्याने फियार्दीच्या घरात शिरले व जगताप याला बाहेर ओढून नेऊ लागले. मात्र, आरतीसाठी अनेक लोक आल्याने त्यांनी जगताप याला बाहेर नेऊन दिले नाही. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. मात्र, रात्री ११ वाजता जगताप यांना घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून काही मुलांचा जोरजोराने बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे ते आणि त्यांची आई घराच्या मागे गेले असता सर्व आरोपी तेथेच बसलेले होते. फिर्यादी आणि त्यांच्या आईने आरोपींना तुम्ही आरतीमध्ये येऊन का गोंधळ घातला, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपी आणि या दोघांमध्ये वाद झाला. भांडणाचा आवाज ऐकून जगताप यांचा मित्र अमित पोटे तेथे आला. तो भांडणे सोडवू लागला. त्याचवेळी आरोपींनी कोयते आणि लोखंडी दांडक्याने फियादी त्यांची आई आणि पोटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांची आई तसेच अमित पोटे पळून जाऊ लागले. आरोपींनी पोटे याला पकडून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात पोटे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस