शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गळा आवळून तरुणाचा खून; मृतदेह टाकला पडिक विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 18:00 IST

crime news : सुमारे दहा ते बारा दिवासांपूर्वी ही घटना घडली असावी, असेही पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

नाशिक : ‌येथील वडाळागाव परिसरातील अण्णाभाऊ साठेनगरजवळील निर्जन भागातील साळवे मळ्यातील पडीक विहिरीत शनिवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकऱ्यास आढळून आला. मृतदेह पुर्णत: कुजलेला असल्यामुळे ओळख पटू शकलेली नसून या अनोळखी पुरुषाचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

साठेनगरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या साळवे मळ्यात सकाळी हिरामण साळवे हे गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विहिरीत कुठले जनावर कोसळून मृत्युमुखी पडले आहे का? हे बघण्यासाठी ते विहिरीच्या दिशेने धावले. यावेळी विहिरीत डोकावून बघितले असता पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्वरितयाबाबतची माहिती तत्काळ त्यांनी इंदिरानगर पोलिसांना कळविली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, यामुळे त्याची ओळख पटलेली नाही; मात्र या इसमाचा गळा आवळून खून करण्यात येऊन त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कंबर व छातीच्या मध्यभागी दोरीदेखील आवळलेली असल्याचे दिसून आले. सुमारे दहा ते बारा दिवासांपूर्वी ही घटना घडली असावी, असेही पोलीस निरिक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक