शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'एनसीएल'मध्ये पीएचडी करणाऱ्या तरुणाचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने ठेचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 21:52 IST

पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथे पीएचडी करीत असलेल्या विद्यार्थ्याचा गळ्यावर वार करुन खून करण्यात आला.

पुणे : पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथे पीएचडी करीत असलेल्या विद्यार्थ्याचा गळ्यावर वार करुन खून करण्यात आला. त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचे कपडे काढून चेहरा दगडाने ठेचण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह सूस येथील खिंडीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. शिवनगर, सुतारवाडी मुळ रा. मु. जानेफळ (पंडीत) ता. जाफराबाद, जि. जालना) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडीत (वय ३४, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

संदीप पंडीत हे मागील काही वर्षापासून पुण्यातील सुतारवाडी परिसरात राहण्यास आहेत. सुदर्शन हा पुण्यातील पाषाण येथील प्रसिध्द नॅशनल केमीकल लॅब्रॉटरी (एनसीएल) रसायन शास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी दीड वर्षापूर्वी पुण्यात आला होता. तो सुतारवाडी परिसरात पेईंग गेस्ट स्वरूपात राहत होता. काल रात्री तो घरी आला नव्हता. शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना सूस खिंडीत एक मृतदेह पडलेल्या आढळून आला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. सुदर्शनच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या गळ्यावर वार करून व ओळख पटू नये यासाठी चेहरा विद्रुप करण्यासाठी दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून आले.

घटनास्थळाजवळच एक पाकीट आढळून आले. त्यावरुन सुदर्शन याची ओळख पटली. पाकीटात आधारकार्ड होते. त्याच आधारकार्डाच्या आधारे पोलिसांना सुदर्शनच्या भावाविषयी माहिती समजले. तो पेईंग गेस्ट म्हणून रहात असलेल्या बरोबरच्या तरुणांकडे चौकशी केल्यावर तो अभ्यासासाठी जात असल्याने अनेकदा रात्री घरी येत नसे. त्यामुळे काल रात्री अभ्यासामुळे तो घरी आला नाही असे त्याच्या मित्रांना वाटले. त्याच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे