किरकोळ वादातून अंधेरीत तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 05:46 IST2019-04-20T05:46:06+5:302019-04-20T05:46:08+5:30

किरकोळ वादातून अंधेरीत शुक्रवारी रात्री एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला.

The murder of a young man in a dark fight | किरकोळ वादातून अंधेरीत तरुणाची हत्या

किरकोळ वादातून अंधेरीत तरुणाची हत्या

मुंबई : किरकोळ वादातून अंधेरीत शुक्रवारी रात्री एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला.
संदीप पाल (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात गिलबर्ट हिलमध्ये राहत होता. याच ठिकाणी राहणाऱ्या एका टोळक्यासोबत त्याचा काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर गेले चार दिवस ती टोळी शस्त्र घेऊन पाल याला शोधत होती. शुक्रवारी रात्री अंधेरीत तो त्यांना सापडताच त्याच्यावर चाकूने हल्ला करत ते पसार झाले. यात संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फूटेज तसेच प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: The murder of a young man in a dark fight