भिवंडी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तीची ओढणीच्या मदतीने गळा आवळून पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. ही घटना भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीस अटक केली आहे.अहमद रजा शहा (२०) हे अटक केलेल्या पतीचे नाव असून त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गायत्रीनगर परिसरातील रामनगरमध्ये एका चाळीत अहमद हा पत्नीसह राहत होता. अहमद लूम कारखान्यात कामगार म्हणून काम करीत होता. चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. अहमद सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पतीपत्नींमध्ये रोज भांडण व्हायचे. रविवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. त्यावेळी पत्नीची ओढणीने गळा आवळून त्याने हत्या केली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व अहमद याला अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण कबाडी करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून नवविवाहितेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 23:56 IST