बुलडाण्यात अनैतिक संबंधातून महिलेची तिच्या दोन मुलींसह हत्या; आरोपीला कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 03:42 AM2020-10-16T03:42:32+5:302020-10-16T03:42:49+5:30

मुलींचे मृतदेह विहिरीत, तर महिलेचा हौदात

Murder of a woman with her two daughters in an immoral relationship in Buldana; Accused remanded | बुलडाण्यात अनैतिक संबंधातून महिलेची तिच्या दोन मुलींसह हत्या; आरोपीला कोठडी 

बुलडाण्यात अनैतिक संबंधातून महिलेची तिच्या दोन मुलींसह हत्या; आरोपीला कोठडी 

Next

मोताळा (बुलडाणा) : आईसह दोन मुलींची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बु. येथे गुरुवारी उघडकीस आली. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दादाराव अंबादास म्हैसागर (३८, रा. पिंपळखुटा बुद्रुक) यास न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुमनबाई शंकर मालठाने या पती व दोन मुलींसह पिंपळखुटा बुद्रुक येथे राहत होत्या. त्यांची मुलगी राधा हिच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे राधा ही अंदाजे आठ-दहा वर्षांपासून माहेरी वास्तव्यास होती. दुसरी मुलगी शारदा हिचा घटस्फोट झाल्याने तीसुद्धा दीड-दोन वर्षांपासून आई-वडिलांकडे राहत होती.

मालठाणे कुटुंब आरोपी दादाराव म्हैसागर याच्या शेतात मजुरीने काम करण्यासाठी जात होते. यातूनच आरोपी आणि विधवा राधा मालठाणे यांचे सूत जुळले. त्यातून राधा हिला गर्भधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा सोक्षमोक्ष लावा, असा तगादा राधाने दादाराव म्हैसागर याच्याकडे लावला होता. त्यामुळे विवाहित असलेला दादाराव म्हैसागर हा हादरला. दादाराव म्हैसागर यास चार मुले आहेत. अनैतिक संबंध चव्हाट्यावर येऊ नये यासाठी त्याने मायलेकींची हत्या करून त्यांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. सुमनबाई यांचा मृतदेह पाण्याच्या हौदात तर दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीत फेकले होते.

आरोपी वाढण्याची शक्यता
तिन्ही मायलेकींची हत्या आपणच केल्याची कबुली दादाराव म्हैसागर याने पोलिसांकडे दिली आहे; मात्र तिन्ही मायलेकींची हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे एकट्याचे काम नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

 

Web Title: Murder of a woman with her two daughters in an immoral relationship in Buldana; Accused remanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.