शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

घरात नैसर्गिक विधी केल्याच्या रागात दाेन वर्षीय चिमुरडीची हत्या; सावत्र वडिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 04:35 IST

मुंबई : घरात खेळताना नैसर्गिक विधी केल्याच्या रागात, सावत्र वडिलांनी मुलीच्या कानशिलात लगावली. यातच, मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ...

मुंबई : घरात खेळताना नैसर्गिक विधी केल्याच्या रागात, सावत्र वडिलांनी मुलीच्या कानशिलात लगावली. यातच, मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साकीनाका परिसरात घडली. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी सावत्र वडील आरिफ शेख ऊर्फ जशिम अक्रम अन्सारीला (२८) अटक केली. (The murder of two-year-old girl Stepfather arrested)साकीनाका येथील नेताजीनगर परिसरात दोन वर्षांची शिफा आई रजिया (२८) आणि सावत्र वडील आरिफसोबत राहण्यास होती. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. सकाळी साडेआठच्या सुमारास शिफाने घरात खेळताना जुलाब केले. याचा राग आल्याने आरिफने तिच्या कानाखाली मारले. मारहाणीत ती बेशुद्ध झाली. तिला जवळच्या रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. तपासात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी आईकडे चौकशी केली. तेव्हा वरील घटनाक्रम समोर आला. त्यानुसार पोलिसांनी रजियाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवत आरिफला अटक केली असून अधिक तपास सुरू केला. 

दाेन वर्षीय मुलीने घरात नैसर्गिक विधी करणे स्वाभाविक आहे. यावरून सावत्र पित्याने तिला मारहाण केल्याने व यात तिचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस