शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या तीन दिवसांआधी तरूणाची हत्या, प्रायवेट पार्टही कापला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:43 IST

Crime News : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमला पाठवून चौकशी सुरू केली. पोलिसांना घटनास्थळी दारूचा एक पाउच आणि दोन ग्लासही सापडले आहेत. 

Crime News : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका तरूणाची त्याच्या लग्नाच्या तीन दिवसांआधी हत्या करण्यात आली. आरोपींनी या तरूणाचा प्रायवेट पार्टही कापला. तरूणाचा मृतदेह शेतात आढळून आल्यावर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी मृतेदह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमला पाठवून चौकशी सुरू केली. पोलिसांना घटनास्थळी दारूचा एक पाउच आणि दोन ग्लासही सापडले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी काही लोक नोन नदीकडे जात होते. यादरम्यान तरगांवचा राहणारा नीलम यादव यांचा मृतदेह त्यांना आढळून आला. या लोकांनी याची माहिती गावातील इतर लोकांना दिली तेव्हा एकच गोंधळ उडाला. लगेच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले.

तरूण पांढरा पॅंट आणि पांढऱ्या शर्टमध्ये होता. त्याचं वय साधारण 27 सांगितलं गेलं. प्राथमिक पाहणीत ही घटना प्रेमसंबंधाची दिसत आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला आणि चौकशी सुरू केली.

मोहनपूरच्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की, मृत तरूणाचं नाव धर्मेंद्र कुरील आहे. त्याची बुधवारी हळदही झाली होती. तो हळदीनंतर घरातून निघाला होता. 11 जून रोजी त्याचं लग्न होतं. फतेहपूरमध्ये त्याचं लग्न होणार होतं. अशात प्रश्न विचारला जात आहे की, त्याच्या लग्नाच्या तीन दिवसाआधी त्याची हत्या कुणी आणि का केली असेल? 

पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबियांच्या तक्रारीवरून पुढील चौकशी केली जात आहे. त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. रात्री जेव्हा तरूण गायब झाला तेव्हा त्याची सूचना पोलिसांना देण्यात आली नव्हती. त्याच्या हत्येदरम्यान त्याचा प्रायवेट पार्ट कापण्याचा अर्थ काय आहे? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी