शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशी हत्या; डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 14:37 IST

Murder Case : या घटनेत पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत ठोस पुरावा किंवा माहिती मिळू शकलेली नाही.

ठळक मुद्देराजू पंडीत सोनवणे (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने घाव घालण्यात आलेले आहेत.

जळगाव : निमखेडी शिवारात मुलांनी बापाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी जुन्या जळगावातील आंबेडकर नगरातही खुनाची घटना उघड झाली. राजू पंडीत सोनवणे (वय ५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने घाव घालण्यात आलेले आहेत. दरम्यान, या घटनेत पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत ठोस पुरावा किंवा माहिती मिळू शकलेली नाही.   

जुन्या जळगावात राजू पंडीत सोनवणे हे वरच्या मजल्यावर एकटे वास्तव्य करीत होते, तर खाली आई द्रौपतीबाई या वास्तव्याला आहेत. सोमवारी सकाळी १०.१५ वाजता नळांना पाणी आले होते. पाणी भरण्यासाठी राजू खाली नळावर का आले नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या आशा सोनवणे या त्यांना आवाज देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता राजू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी हा प्रकार त्यांची आई व इतर नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे,उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक फौजदार रवींद्र पाटील, अमोल पाटील, गिरीश पाटील आदींचा ताफा दाखल झाला. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरुन काही नमुने संकलित केले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.दोन घटनांनी शहर हादरलेसतत आईच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या प्रेमसिंग अभयसिंग राठोड (वय ५०, मुळ रा.घनश्यामपूर, ता.खकनार, जि.बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांचा मुलाने छातीत चॉपर खोपसून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली होती. यात गोपाल व  दीपक या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा आंबेडकर नगरात खुनाचा घटना घडली. यात देखील पुतण्यावरच संशय व्यक्त केला जात आहे. सलगच्या दोन घटनांनी शहर हादरले आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसJalgaonजळगाव