शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांच्या वादातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 16:10 IST

अवघ्या १०० रुपयांच्या व्यवहारामुळे ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्दे या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. कॅटरिंगचा व्यवसाय असलेला जितेंद्र हा रविवारी रात्री दारूच्या नशेत नागपाड्यातील कामाठीपुरा येथे आला होता. मात्र या वेश्या महिलेने १०० रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. 

मुंबई - पैशाच्या वादातून नागपाडा परिसरात राहणाऱ्या एका तरूणाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली होती. या हत्येचा अवघ्या १२ तासांमध्ये उलगडा करत नागपाडा पोलिसांनी जितेंद्र कुमार (२८) या तरूणाला अटक केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. अवघ्या १०० रुपयांच्या व्यवहारामुळे ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.कॅटरिंगचा व्यवसाय असलेला जितेंद्र हा रविवारी रात्री दारूच्या नशेत नागपाड्यातील कामाठीपुरा येथे आला होता. एका वेश्यासोबत त्याची ४०० रुपयांत बोलणी ठरली. त्यानुसार जितेंद्रने ५०० रुपयांची नोट महिलेला दिली. मात्र, बाहेर पडताना वेश्या महिलेने उरलेले १०० रुपये न देता, जितेंद्रला जाण्यास सांगितले. यावेळी त्याने उरलेले १०० रुपये परत मागितले. मात्र या वेश्या महिलेने १०० रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. 

याच वादातून राग अनावर झालेल्या जितेंद्रने नशेत सोबत आणलेल्या चाकूने वेश्या महिलेवर हल्ला केला. त्यावेळी महिलेला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शहाबाज मर्चंट याच्यावर देखील जितेंद्रने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वेश्या आणि शहाबाज मर्चंट हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले. दोघांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वेश्या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच  रुग्णालयात दाखल शहाबाज मर्चंट याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी जितेंद्रवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसायJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय