शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

टॅटू काढण्यावरून झाला वाद आणि मग सराईत गुन्हेगाराचा 'जिगरी' मित्रांनीच केला खून; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 16:35 IST

लातूरला पळून जाणाऱ्या आरोपींना सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी केले जेरबंद

ठळक मुद्देभोसरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून घेतला शोध

पिंपरी : जुने भांडण व हातावर टटू काढण्याच्या कारणावरून जिगरी मित्रांनी सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. दिघी रोड, भोसरी येथे शनिवारी (दि. ८) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर आरोपी लातूरला पळून जात होते. भोसरीपोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावर पाठलाग करून पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. मयूर हरिदास मडके (वय २६, रा. आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. रोशन हरी सौडतकर (रा. दिघी रोड, भोसरी), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवंग्रा, ता. औसा, जि. लातूर), प्रणेश चंद्रकात घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क, दिघी), वैभव तान्हाजी ढोरे (रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर मडके हा आरोपींचा जिगरी मित्र होता. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मयूर आणि त्याचे मित्र दिघी रोडवर दारू प्यायला बसले. त्यानंतर आणखी काही मित्र तेथे आले. जुने भांडण तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी होऊन मयूरचा मृत्यू झाला.याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भोसरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला. खून केल्यानंतर आरोपी लातूर येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्यावर भोसरी पोलिसांच्या पथकाने आरोपी यांना जेरबंद केले. भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, आशिष गोपी, संतोष महाडिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकMurderखून