शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये पूर्ववैैमनस्यातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:10 IST

थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ सहा जणांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला...

पिंपरी : मित्राच्या आईसोबत गाडीवरून जात असताना तरुणावर सहा जणांनी सपासप वार केले. त्यामध्ये तरुणाच्या शरीरातून गंभीर इजा झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. १५) रात्री सव्वा बाराच्या सुमारास थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबासाहेब महादेव वडमारे (वय ३०, रा. कैैलासनगर, थेरगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अनिकेत रुपसिंग भाट (वय २१), राहुल ऊर्फ सुधीर सहदेव झेंडे (वय २२), मेहबूब दस्तगीर पटेल (वय २२) युवराज अशोक शिंदे (सर्व रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर स्वप्नील सगर व रुतिक ऊर्फ वृषभ रमेश मिश्रा (दोघे रा. थेरगाव) फरार आहेत. याप्रकरणी विशाखा महादेव वडमारे (वय २८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब सोमवारी (दि. १५) रात्री सव्वा बाराच्या सुमारास मित्राची आई अनिता भाट (वय ४५) यांना दुचाकीवर घेऊन येत होता. दरम्यान, थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ सहा जणांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये बाबासाहेब आणि अनिता दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांना काळेवाडी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाबासाहेब याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला चिंचवड येथील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. नातेवाइकांना हल्ल्याबाबत काहीच माहिती नसल्याने डॉक्टरांनी वाकड पोलिसांना अपघाताची खबर दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी बाबासाहेब यांचा अपघात झाल्याची नोंद केली.  काही दिवस उपचार घेतल्यानंतर बाबासाहेब काही वेळेसाठी शुद्धीवर आले. त्या वेळी त्याने बहीण विशाखा हिला आपल्यावर हल्ला झाला असल्याचे सांगितले. मात्र विशाखाला माहिती देत असतानाच बाबासाहेब पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर विशाखाला अनिता यांच्यावरही हल्ला झाल्याचे समजले, तिने याबाबत माहिती घेतली असता हल्ला झाला असल्याचे समजले. तिने तत्काळ वाकड पोलिसांना माहिती देत फिर्याद नोंदवली.               वाकड पोलिसांनी तपास करत या प्रकरणातील चार जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता, आरोपी अनिकेत भाट आणि फिर्यादी विशाखा यांचे मागील सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून अनिकेत याच्या सांगण्यावरून त्याचासह पाच जणांनी मिळून विशाखा यांचा भाऊ बाबासाहेब यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून