शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

पाटणामध्ये खळबळ! इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

By पूनम अपराज | Updated: January 13, 2021 19:20 IST

Shot Dead : या गोळीबारात रुपेश हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देमोटारसायकलवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी रुपेश यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर येत आहे.

बिहारची राजधानी पाटणामध्ये मंगळवारी रात्री बाजारात इंडिगो कंपनीचे स्टेट हेड रुपेश सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रुपेश ऑफिसमधून घरी परतत होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात रुपेश हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

मोटारसायकलवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी रुपेश यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर येत आहे. रुपेश सिंह हत्याकांडाच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार असल्याचं पाटणा पोलिसांनी सांगितलं. मात्र, रुपेश राहत होते, त्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही गेल्या 2 वर्षांपासून खराब आहे. सीसीटीव्हीचं योग्य फुटेज न मिळाल्यास त्यांच्या हत्याकांडाच्या तपासात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती आज तकने दिली आहे.  

 

पेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. ते काही दिवसांपूर्वी कुटुंबासोबत गोव्यात सुट्टीवर गेले होते. दोन दिवसांपूर्वीच ते पाटणामध्ये परतले होते. बिहारमधील छपराचे रहिवासी असलेले रुपेश पाटाणामधील सामाजिक कामांमध्ये आघाडीवर होते. सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत त्यांचे फोटो आहेत. रुपेश यांना राजकारणाची आवड होती. अनेक राजकीय पक्षांनी त्यांना मागील विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर केली होती. मात्र, त्यांनी ती ऑफर नाकारली होती.

टॅग्स :FiringगोळीबारDeathमृत्यूMurderखूनIndigoइंडिगोBiharबिहारPoliceपोलिस