शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

अल्पवयीन शाळकरी मुलीची हत्या, प्रियकरासह मित्राला गुजरातमधून अटक

By मंगेश व्यवहारे | Updated: September 3, 2022 19:26 IST

वालीव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक

नालासोपारा (मंगेश कराळे) :- गेल्या आठवड्यात नायगाव येथे एका बॅगेत शाळकरी मुलीच्या मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर मुलीची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून निर्जन स्थळी टाकण्यात आला होता. या घटनेनंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात वालीव पोलिसांना यश आले होते. या १४ वर्षीय मुलीची हत्या तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने केल्याचे स्पष्ट झाले होते. हे दोन्ही आरोपी सदर घटनेनंतर फरार झाले होते. मात्र वालीव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या फरार दोन्ही आरोपींना गुजरात राज्यातील पालनपूर येथून शूक्रवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीत या दोघांनी सदर मुलीची हत्या का केली याचा उलगडा होणार आहे. संतोष मकवाना व विशाल अनभवा अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

२६ ऑगस्ट रोजी नायगावच्या परेरा नगर परिसरातील उड्डाणपूलाच्या खाली असेलल्या झुडपात एका बॅगेत १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पोटावर चाकूने १२ ते १५ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. बॅगेजवळच पोलिसांना एका शाळेचा बॅच सापडला होता. त्यावरून तिची ओळख पटविण्यात आली. ही मुलगी ९ वीत शिकत असून तीचे नाव वंशीखा राठोड असुन विलेपार्ले येथील एका शाळेत शिकत होती. सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. तेव्हापासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होती.   जुहू येथे हत्या करून ट्रेनमधून तीचा मृतदेह आरोपींनी बॕगेमध्ये भरुन आणला होता. वालीव पोलिसांनी या हत्येचा त्यानंतर अवघ्या काही तासांतच छडा लावला होता. या मुलीची हत्या तिच्या २१ वर्षीय प्रियकराने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूवारी तिच्या प्रियकारने या मुलीला त्याच्या मित्राच्या जुहू येथील घरी आणले. त्या मित्राचे आई वडील कामाला गेले होते. घरात दोघांनी मिळून मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील ट्रॅव्हल बॅगेत भरला. या बॅगेत घरातून कपडे घेऊन मृतदेह झाकला होता. या दोघांनी बॅगेत भरलेला मृतदेह कोंबल्यानंतर ती बॅग घेऊन विरार लोकलने नायगाव येथे आणून टाकला होता. त्याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना मिळाले होते. हे दोन्ही आरोपी विरार येथून गुजरातला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले होते. अखेर वालीव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुजरात राज्यातील पालनपुर येथून त्या दोघांना अटक केली आहे.

सदर हत्येच्या दोन्ही आरोपींना गुजरात राज्यातून पकडले आहे. दोन्ही आरोपींना शनिवारी वसई न्यायालयात हजर केले असून १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. - कैलाश बर्व्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे) 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई