शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्या सना खान यांची हत्या, मृतदेह नदीत फेकणाऱ्या अमित साहूला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 06:47 IST

सना खान या भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्या अमितच्या बिझनेस पार्टनर होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची मध्यप्रदेशातील त्यांच्या बिझनेस पार्टनरने हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या १० दिवसांपासून सना बेपत्ता होत्या. अमित साहू असे त्या बिझनेस पार्टनरचे नाव असून त्याला नागपूर पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली आहे. त्याने सना खान हिची हत्येची कबुली दिली आहे.

तपासाअंती आरोपी अमित साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मानकापूर पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला अटक केली. १० दिवसांपासून तो तेथेच लपून बसला होता. त्याच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांचे पथक त्याला नागपूरकडे घेऊन निघाले आहे. सना १ ऑगस्टला अमितला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली. गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची माहिती त्याने दिली. 

कोण होत्या सना खान ?सना खान या भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्या अमितच्या बिझनेस पार्टनर होत्या. अमितच्या ढाब्यातही त्यांनी गुंतवणूक केल्याची माहिती आहे.

कोण आहे अमित साहू?अमित साहू हा जबलपूरमधील कुख्यात वाळू व दारू तस्कर आहे. तो एक ढाबादेखील चालवतो. हत्येनंतर तो ढाबा बंद करून पसार झाला होता. सना खान यांचा तो व्यवसायातील भागीदार होता. 

मृतदेहाचा शोध सुरूअमित साहूने सना खानची हत्या केल्यावर तिचा मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. शुक्रवारी अमित पोलिसांना जेथून मृतदेह फेकला होता त्या जागेवरदेखील घेऊन गेला. मात्र, अद्यापही सना खान यांचा मृतदेह सापडलेला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा