घनसावंगी (जि. जालना) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. जखमीचा उपचारादरम्यान रविवारी (दि. २८) मृत्यू झाला. एकनाथ काळे असे मयताचे नाव आहे. ही घटना घनसावंगी तालुक्यातील लिंबोणी येथे घडली. या प्रकरणी एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीर्थपुरी ते कुंभारपिंपळगाव रस्त्यावरील लिंबोणी येथील केशव वैजीनाथ काळे यांंच्या रसवंतीच्या पुढे मधुकर पंढरीनाथ काळे याने दारू पिण्यासाठी एकनाथ काळे यांच्याकडे पैसे मागीतले. पैसे देण्यास एकनाथ काळे यांनी नकार दिला. याचा राग आल्याने मधुकर काळे याने त्यांच्या हातातील चाकू एकनाथ काळे यांच्या पोटात खुपसून त्यास गंभीर जखमी केले. एकनाथ काळे यास उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रविवार त्यांचा मूत्यू झाला.
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:08 IST