गवताच्या पातीने केला हत्येचा उलगडा; अपहरणानंतर केला होता अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:29 AM2018-07-30T04:29:23+5:302018-07-30T04:30:10+5:30

घटनास्थळी आढळून आलेल्या एका गवताच्या पातीने चिमुरड्याच्या हत्या प्रकरणातील दोघा आरोपींपर्यंत मानपाडा पोलिसांना पोहोचता आले. या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा अत्यंत बारकाईने तपास केल्यामुळेच होऊ शकला.

 The murder of the murderer; Atrocities committed after abduction | गवताच्या पातीने केला हत्येचा उलगडा; अपहरणानंतर केला होता अत्याचार

गवताच्या पातीने केला हत्येचा उलगडा; अपहरणानंतर केला होता अत्याचार

Next

- सचिन सागरे

डोंबिवली : घटनास्थळी आढळून आलेल्या एका गवताच्या पातीने चिमुरड्याच्या हत्या प्रकरणातील दोघा आरोपींपर्यंत मानपाडा पोलिसांना पोहोचता आले. या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा अत्यंत बारकाईने तपास केल्यामुळेच होऊ शकला.
पूर्वेतील देसलेपाडा परिसरातील चाळीत राहणारा सातवर्षीय शाळकरी मुलगा २४ मे रोजी खेळत असताना घराबाहेरून बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नजीकच्या एका बांधकामाच्या ठिकाणी डेÑनेजच्या टाकीतील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला होता. मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना शवविच्छेदनानंतर प्राप्त झाला होता. त्यानंतर, या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी पोलीस अधिकाºयांची विशेष पथके गठीत केली होती. तपासादरम्यान या अधिकाºयांनी घटनास्थळाचे छायाचित्र पाहिले असता, मृतदेहाजवळ त्यांना गवताची पाती आढळली. हे गवत या परिसरात उगवणारे नव्हते. ज्याठिकाणी ही घटना घडली, त्याठिकाणी एका इमारतीचे काम सुरू होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. ज्याठिकाणी एहसान आणि नदीमने मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते, तिथपर्यंत तपास अधिकारी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी आढळलेली गवताची पाती त्यांना तिथेही आढळली. त्यानुसार, ज्या दिवशी ही घटना घडली होती, त्यावेळी या ठिकाणी कोण राहायला होते, याचा शोध पोलिसांनी घेतला असता, मूळचे बिहारचे राहणारे एहसान आणि नदीम या दोघांची नावे समोर आली.

दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत
एहसान आणि नदीम हे दोघे प्लंबर म्हणून कामाला होते. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना काहीच सांगितले नाही. मात्र, पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्या असता संशयाची सुई त्यांच्याकडे वळली. दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून बंडू पाटील तसेच अतिरिक्त सरकारी वकील म्हणून प्रदीप बावस्कर हे काम पाहत असून अनिरुद्ध कुलकर्णी आणि विशाल गायकवाड हे त्यांना सहकार्य करीत आहेत.

Web Title:  The murder of the murderer; Atrocities committed after abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा