शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय भजन गायक अजय पाठक यांची कुटुंबीयांसह क्रूर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 13:39 IST

अजय पाठक यांच्या राहत्या घरी घडले क्रूर हत्याकांड

लखनौ - आंतरराष्ट्रीय भजन गायक अजय पाठक आणि त्यांच्या कुटुंबीयांची धारदार शस्राने वार करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील शामली येथे पाठक यांच्या राहत्या घरी हे हत्याकांड घडले आहे. यामध्ये अजय पाठक यांच्यासह त्यांची पत्नी स्नेहा पाठक, मुलगी वसुंधरा पाठक आणि मुलगा भागवत पाठक यांची हत्या करण्यात आली.अजय पाठक हे मंगळवारी सकाळी संपूर्ण कुटुंबासह कर्नाला येथे एका कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यामुळे सकाळपासून त्यांच्या घराला टाळे लागलेले होते. मात्र संध्याकाळी कुटुंबीयांनी त्यांना फोन केला असता फोन लागला नाही. तसेच त्यांची गाडीही गायब होती. त्यामुळे शंका आल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी घराचे टाळे तोडले. त्यावेळी तिघांचेही मृतदेह आतमध्ये पडलेले होते. तसेच त्यांचा मुलगा भागवत हा बेपत्ता होता. नंतर त्याचाही मृतदेह सापडला. दरम्यान, हा प्रकार उघड होताचा कुटुंबीयांना धक्का बसला. घटनेची खबर कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हा आरोपी अजय पाठक यांच्या मुलाचा मृतदेह आणि गाडीला आग लावण्याचा प्रयत्न करत होता. हिमांशू असे त्याचे नाव असून, पाठक यांच्या मुलाचा मृतदेह आणि गाडीला आग लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती समोर आली आहे. या भयानक हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच घटनास्थळावर आजूबाजूच्या रहिवाशांची मोठी गर्दी झाली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश