हिंजवडीत हत्याराने मारहाण करून मित्रांनी केला खून; दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 10:01 PM2020-12-31T22:01:23+5:302020-12-31T22:01:37+5:30

आरोपींनी हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर केले वार

Murder by friends in Hinjewadi; Charges filed against two accused | हिंजवडीत हत्याराने मारहाण करून मित्रांनी केला खून; दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

हिंजवडीत हत्याराने मारहाण करून मित्रांनी केला खून; दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Next

पिंपरी : हत्याराने कपाळावर, हातावर, छातीवर मारहाण करून एकाला गंभीर जखमी करून खून केला. मुळशी तालुक्यातील नेरेदत्तवाडी येथे गुरुवारी (दि. ३१) खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रामदास पिंजण (वय ३५, रा. कासारसाई, ता. मुळशी), असे खून झालेल्याचे नाव आहे. तर नवनाथ शेडगे व ऋषिकेश भिंताडे (दोघे रा. कासारसाई), अशी आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी दिनेश रामदास पिंजण (वय ३३, रा. नेरेदत्तवाडी, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. मयत गणेश हा फिर्यादी दिनेश यांचा भाऊ आहे. मयत गणेश आणि आरोपी शेडगे व भिंताडे हे मित्र होते. आरोपींनी अज्ञात कारणावरून हत्याराने कपाळावर, हातावर व छातीवर मारहाण करून गणेश यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह नेरेदत्तवाडी येथील मोकळ्या प्लाॅटमध्ये फेकून दिला.

Web Title: Murder by friends in Hinjewadi; Charges filed against two accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.