Murder of a friend with a knife at Aronda; The type of tobacco that came from begging | आरोंदा येथे चाकूने वार करत मित्राचा खून; तंबाखू मागण्यावरून घडला प्रकार    
आरोंदा येथे चाकूने वार करत मित्राचा खून; तंबाखू मागण्यावरून घडला प्रकार    

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे तंबाखू मागण्यावरून दोघा मित्रात झालेल्या  बाचाबाची पर्यावसण खूनात झाले असून स्वप्निल जोशी या युवकांचा छातीवर चाकूने वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी स्वपनिल यांचा मित्र दिलीप मोर्जे याला अटक केली असून पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  

दिलीप मोर्जे हा स्वपनिलचा मित्र असून दोघे ही एकाच वाड्यात रहात मोलमजुरी करत होते. ही घटना बुधवारी रात्री च्या सुमारास घडली असून या प्रकरणाने आरोंदा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

रात्रीच्या वेळी  तंबाखू मागण्या वरून वादावादीला सुरूवात झाली होती. त्यानंतर या दोघांत बाचाबाची झाली असे पोलिसांनी सांगितले मोर्जे यांने चाकूने वार करत स्वपनिलचा खून केला पोलीसांनी घटनास्थळावरून चाकू जप्त केला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Murder of a friend with a knife at Aronda; The type of tobacco that came from begging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.