बारामती । दि. १४ ( प्रतिनिधी) :जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची घटना बारामती शहरातील प्रगतीनगर भागात घडली. या घटनेमुळे शहरात खळगळ उडालीआहे.युवतीने काही दिवसांपुर्वी आंतरजातीय विवाह केला होता.त्यानंतर मात्र, तिचा पती नांदविण्यास नेत नव्हता.यावरुन घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने हा खुन केला. ऋतूजा हरीदास बोभाटे (वय १९) असे खुन झालेल्या युवतीचे नाव आहे.मंगळवारी (दि १४) सकाळी हि घटना प्रगतीनगर परीसरातील युवतीच्या घरात घडली. तिचा डोक्यात दगड घालून आई संजीवनी हरीदास बोभाटे हिनं खून केलाआहे. मुलीचं प्रेम प्रकरण असल्यानं खून आई संजीवनी हिने दिली आहे.खूनानंतर आई संजीवनी बोभाटे झाली स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली.
जन्मदात्या आईनेच केला मुलीचा डोक्यात दगड घालुन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:18 IST