शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी, मुलाची हत्या; मृतदेह लटकवले झाडाला, मुलीच्या वडिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 08:43 IST

गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले.

जामुई : बिहारमधील जामुई जिल्ह्यातील जंगलात मंगळवारी किशोरवयीन मुलगी आणि मुलाचा मृतदेह झाडाला लटकताना आढळला. या दोघांच्या संबंधांना मुलीच्या कुटुंबाची मान्यता नसल्यामुळे त्यांनी या दोघांना ठार मारले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

गेल्या सहा महिन्यांत जामुई जिल्ह्यात अशाप्रकारे हत्या होण्याचा हा दुसरा प्रकार आहे. मुलगी व मुलगा एकाच समाजाचे असल्याचे पोलीस म्हणाले.

जामुईचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनी या हत्याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली तर इतर आरोपी फरार आहेत, असे सांगितले. प्राथमिक चौकशीच्या आधारे मंडल म्हणाले की, या हत्येत मुलीच्या तीन मेहुण्यांचा सहभाग असल्याचे सूचित होते कारण हे तिन्ही मेहुणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपींनी मुलगी व मुलाला ठार मारण्याचा कट रचला नव्हता, असे सांगून मंडल म्हणाले की,‘मुलीचे वडील व इतरांनी मुलीला मुलासोबत पाहिले आणि तिच्या भांगेत भडक कुंकू पाहिल्यावर त्यांना राग अनावर झाला व हत्या घडली.’ मुलगी व मुलगा लग्न करण्यासाठी मंदिरात गेले होते. काही ग्रामस्थांनीही त्यांना पाहिल्यावर मुलीच्या वडिलांना तसे सांगितले. तिचे वडील व इतर नातेवाईक त्यामुळे संतापले. त्यांनी त्या दोघांना शेतात ओढत नेले व त्यांचा गळा दाबला व मृतदेह झाडाला लटकावले, असे पोलीस म्हणाले.

दोघेही बोर्ड परीक्षा उत्तीर्ण- मुलगी व मुलाने यावर्षी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सोमवारी ते दोघे घरातून बाहेर पडले व नंतर एकाच कपड्याने ते झाडाला लटकताना आढळले. - मुलीची आई म्हणाली की, ती काही कामानिमित्त घरातून बाहेर गेली होती, तर मी मुलाला साखर आणण्यासाठी पाठवले होते, असे मुलाची आजी म्हणाली. या हत्यांनंतर त्या भागात बुधवारी बंद पाळला गेला. सर्व संशयितांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक