By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 16:37 IST
Murder accused to be arrest soon : प्रफुल्ल सुभाष सवणे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत प्रफुल्ल याचे वडील हे आपल्या भावासह सिद्धार्थ कॉलनीतील घरात कित्येक वर्षांपासून रहात होते.
ठळक मुद्देउपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयावर आज मोर्चा काढला.परंतु पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मोनोरेल स्थानकखाली अडवून त्यांना आरोपींना अटक केली असल्याचे सांगून घरी पाठ
बुधवारी रात्री घरगुती वादातून प्रफुल्ल सुभाष सवणे (२५) याची त्याच्या चुलत भावाने आपल्या साथीदारांसह चेंबूरच्या स्वस्तिक पार्क येथे चाकूने वार करून हत्या केली. यामुळे प्रफुल्लच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी नागरिकांची मागणी आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
जोपर्यंत प्रफुल्लच्या मारेकऱ्यांना अटक करत नाही तो पर्यंत मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही या मागणी करिता सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांनी पोलीस उपआयुक्त कार्यालयावर आज मोर्चा काढला परंतु हा मोर्चा पोलिसांनी मोनो स्टेशन खाली अडविला. काकाने विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा दिला नसल्याचा राग मनात ठेवून पुतण्याने काकांचा राग चुलत भावावर काढत सोमवारी रात्री त्याला आपल्या मित्रांसह गाठून त्याच्यावर चाकूने वार केले.आज उपचारदरम्यान त्याचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. प्रफुल्ल सुभाष सवणे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत प्रफुल्ल याचे वडील हे आपल्या भावासह सिद्धार्थ कॉलनीतील घरात कित्येक वर्षांपासून रहात होते.
मृत प्रफुल्लचे काका यांचे काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर काकांची पत्नी आपल्या मुलासह दुसरीकडे रहाण्यास गेली होती.प्रफ्फुलच्या वडीलाने २ वर्षापूर्वी राहते घर विकले व दुसरीकडे रहाण्यास गेले. परंतु विकलेल्या घराचा अर्धा हिस्सा आपल्या आईला दिला नसल्याचा राग मनात ठेवून आरोपीने आपल्या साथीदारांसह ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल याचा कुर्ला सिग्नलपासून पाठलाग करीत त्याला स्वस्तिक पार्क उद्यान नजीक गाठले आणि भररस्त्यावरच चाकूने भोसकले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांनी पोलीस उपायुक्त कार्यालयावर आज मोर्चा काढला.परंतु पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना मोनोरेल स्थानकखाली अडवून त्यांना आरोपींना अटक केली असल्याचे सांगून घरी पाठविले.