शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केल्याने मुलाने त्रिशूलने केली वडिलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:11 IST

आरोपीच्या वडिलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना भीखेपूर गावातील आहे.

उत्तर प्रदेशच्या औरैयामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केली. कारण इतकंच होतं की, वडिलांनी त्याला गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केली होती. वडिलांच्या हत्येनंतर मुलगा फरार झाला आहे. कुटुंबियांनी सांगितलं की, गर्लफ्रेन्डसोबत बोलण्यास मनाई केल्यामुळे मुलगा आणि वडिलांमध्ये नेहमीच वाद होत होता. 

आरोपीच्या वडिलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना भीखेपूर गावातील आहे. अरविंद कुमार हे आपल्या परिवारासोबत राहत होते. त्यांच्या परिवारात १० मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे. ५ व्या नंबरचा मुलगा शिवम याचं एक मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. वडील शिवमला यावरून पुन्हा पुन्हा बोलत होते. यावरून दोघांमध्ये नेहमीच भांडण होत होतं. याच रागातून शिवमने वडिलांची त्रिशूलने हत्या केली. (हे पण वाचा : धक्कादायक! एक्स गर्लफ्रन्डवर त्याने चाकूने केले ४७ वार, जीव जाईपर्यंत व्हिडीओ करत राहिला रेकॉर्ड)

मृतकाचा मुलगा प्रदीनने सांगितलं की, वडिलांनी शिवमला त्या मुलीसोबत बोलण्यास मनाई केली होती. ज्यामुळे शिवम नाराज होता. सोमवारी सायंकाळी शिवम घरातून निघून गेला होता. रात्री उशीरा तो घरी परतला. त्याने जवळ्याच मंदिरातून एक त्रिशूल आणला होता आणि झोपलेल्या वडिलांवर त्याने वार केला. त्यानंतर तो पळून गेला.

प्रदीपने पुढे सांगितलं की, वडिलांचा ओरडण्याचा आवाज आल्यावर आम्ही गेलो तर ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना लगेच हॉस्पिटलमद्ये दाखल केलं. पण तोपर्यंत त्यांचं बरंच रक्त वाहून गेलं होतं. ज्यानंतर त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस शिवमचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी