शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भायखळ्यामध्ये डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांचा तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:20 IST

Crime News : अब्दुल जेव्हा आत गेले तेव्हा वसीम शेख हे डोक्याला मोठी जखम झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मुंबई : डॉकयार्ड रोड येथे शनिवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली.  या व्यक्तीच्या  डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानुसार याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

शनिवारी पहाटे डॉकयार्ड रोडच्या गोदरेज केबिन परिसरात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वसीम शेख (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी नुरा नावाच्या व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी अब्दुल कादीर अयुब वाघू (३९) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अब्दुल हे त्यांचे मित्र कासिम शेख आणि शाहरुख मोमीन यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी त्यांना गोदरेज केबिनवर मोठा दगड पडल्याचा आवाज आला. तो ऐकून त्यांनी तिकडे धाव घेतली. ते पोहोचताच एक व्यक्ती धावत बाहेर आली आणि शिडीवर चढून डॉकयार्ड स्टेशनवर गेली.  

अब्दुल जेव्हा आत गेले तेव्हा वसीम शेख हे डोक्याला मोठी जखम झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वसीमला जे. जे. रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना  मृत घोषित केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई