शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शंभर रुपयांसाठी केला सख्ख्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:15 IST

मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आईवर वेळ 

ठळक मुद्देआरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी 

दिंद्रूड (जि. बीड) : पैशाच्या कारणाने सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील नाखले पिंपळगाव येथे घडली. लक्ष्मण काळे (वय २८) या मयताच्या आईच्या फिर्यादीवरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. 

दिंद्रूड पोलीस हद्दीतील नाखले पिंपळगाव येथे गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे दोघे भाऊ राहतात. या भावंडांत दारूच्या नशेत नेहमीच वाद होत होते. शनिवारी रात्री शंभर रुपयांवरून गजानन व लक्ष्मण यांच्यात हाणामारी झाली. यात डोक्यात मोठी जखम झाल्याने लक्ष्मण काळे (वय २८) याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच दिंद्रूड पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह माजलगाव येथील ग्रामीण  रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

दरम्यान, मयत लक्ष्मणची आई कस्तुराबाई काळे हिच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन काळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गजानन दशरथ काळे यास अटक करण्यात आली आहे. तपास दिंद्रूड ठाण्याचे सपोनि. अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, विजेंद्र नाचन आदी करत आहेत.

आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपी गजानन यास सोमवारी ( दि. १) माजलगाव न्यायालयाने हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सपोनि गव्हाणकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीड