शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरून खून; कोयता आणि पाईपने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 10:23 IST

Pune Crime News : पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरुन झालेल्या भांडणातून कोयत्याने तसेच पाईपने मारहाण करून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील नांदेड फाटा परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

पुणे/धायरी - पानटपरीवरील उधारीच्या पैश्यावरुन झालेल्या भांडणातून कोयत्याने तसेच पाईपने मारहाण करून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील नांदेड फाटा परिसरात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अजय शिवाजी शिंदे (वय :२३, रा. गोसावी वस्ती, नांदेड, तालुका :हवेली, जिल्हा: पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत तरुणाचा मावसभाऊ राकेश तुळशीराम जाधव(वय: २४, रा. जाधव नगर, गोसावी वस्ती, नांदेड, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ॉयाबाबत अधिक माहिती अशी की, मयत अजय शिंदे व आरोपी राहुल सपकाळ यांच्यात पूर्वीपासून वाद होता. आरोपीची त्या भागात पूर्वी पानटपरी होती. गुरुवारी रात्री नांदेड परिसरातील कीर्ती बारसमोर राहुल सपकाळ व अजय शिंदे यांच्यात पानटपरीच्या उधारीवरून बाचाबाची झाली. यावेळी त्यांच्यातील वाद टोकाला गेल्याने आरोपी राहुल सपकाळ व इतर सहा जणांनी मिळून अजयच्या डोक्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने वार करून विटाने तसेच पाइपने मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान जखमी अवस्थेत असणाऱ्या अजयला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक दिनेश कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष भापकर, राजेंद्र मुंढे, महेंद्र चौधरी, पोलीस मित्र सुदीप पोळ हे दाखल झाले होते. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात राहुल सपकाळ, रोहित सपकाळ, दुर्वेश उर्फ दुर्ग्या, सुधीर उर्फ सुध्या, पृथ्वी उर्फ चिराग ( सर्व रा. नांदेड गाव, ता. हवेली, जिल्हा पुणे) व त्यांचे अन्य तीन साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार पुढील तपास करीत आहेत.महिन्यातील दुसरी घटना१८ ऑक्टोबर रोजी नांदेड फाटा परिसरात यश कांबळे या तरुणाचा खून करण्यात आला होता. ह्या नांदेड फाटा परिसरातील ही दुसरी घटना असल्याने येथील नागरिकांत व व्यावसायिकात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून वेळीच जरब बसविणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPuneपुणे