शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या व्यावसायिकाला ग्राहक मंचच्या आदेशाने अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 19:27 IST

दरखास्त प्रकरण : आदेशाची पूर्तता न करणे भोवले

ठळक मुद्देमध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.हेमंत मेहता (रा. घाटकोपर पूर्व) असे सदर व्यावसायिकाचे नाव आहे. मेहता यांच्या वकिलांनी जामीनसाठी जिल्हा ग्राहक मंचात अर्ज केला.

अमरावती - निवाड्यातील आदेशाची पूर्तता न करणाऱ्या मुंबईच्या एका व्यावसायिकाला जिल्हा ग्राहक मंचच्या आदेशाने पोलिसांनी बुधवारी अटक केली. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दरखास्त प्रकरण दाखल केले होते. त्या अनुषंगाने समन्स व वॉरंट निघाला होता. बुधवारी व्यावसायिक ग्राहक मंचात हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्याचे आदेश झाले. त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. सूत्रानुसार, हेमंत मेहता (रा. घाटकोपर पूर्व) असे सदर व्यावसायिकाचे नाव आहे. शहरातील ओम कॉलनीतील रहिवासी अभिजित किशोर सपकाळ व अन्य एक यांच्या शेतजमिनीवरील शेडनेट उभारण्याविषयी व्ही.आर. अ‍ॅग्रोटेकतर्फे हेमंत मेहता यांच्याशी आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहाराच्या अनुषंगाने किशोर सपकाळसह दोघांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदविली. ग्राहक मंचाने दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर २ डिसेंबर २०१५ रोजी निर्णय दिला. हेमंत मेहता यांनी तक्रारकर्त्यास ३० दिवसांच्या आत ७ लाख ५९ हजार ३१० रुपये १० टक्के व्याजासह रक्कम परत करावी, नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये द्यावे, तक्रार खर्च १० हजार रुपये द्यावा, असे आदेश ग्राहक मंचने पारित केले होते. मात्र, आदेश प्राप्त झाल्यानंतरही हेमंत मेहता यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने ग्राहक मंचकडे ६ जानेवारी २०१७ रोजी दरखास्त प्रकरण दाखल केले. ग्राहक मंचाकडून हेमंत मेहतांना समन्स पाठविण्यात आला. त्यानंतरही ते उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा वॉरन्ट काढण्यात आला. बुधवारी हेमंत मेहता ग्राहक मंचात उपस्थित झाले. त्यावेळी ग्राहक मंचाने हेमंत मेहतांना अटक करण्याचे आदेशीत केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठविले. मेहता यांच्या वकिलांनी जामीनसाठी जिल्हा ग्राहक मंचात अर्ज केला. अध्यक्ष व सदस्य यांनी त्यांच्या जामीनचे आदेश गुरुवारी पारित केले.

टॅग्स :Arrestअटकbusinessव्यवसायjailतुरुंगconsumerग्राहकMumbaiमुंबई