शहरं
Join us  
Trending Stories
1
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
2
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
3
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
4
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
5
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
6
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
7
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
8
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
9
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
10
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
11
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
12
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
13
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
14
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
15
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
16
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
17
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
18
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
19
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा

जेव्हा आईच पोटच्या गोळ्याचा जीव घेते...

By मनीषा म्हात्रे | Updated: May 22, 2025 12:59 IST

अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले.

मुंबई : अवघ्या अडीच वर्षांची चिमुकली. वडिलांची साथ सुटल्यानंतर आईला सर्वस्व मानणारी. मात्र, आईच्या ममतेला काळिमा फासणाऱ्या या आईने प्रियकराची वासना भागविण्यासाठी पोटच्या गोळ्याला पुढे केले. प्रियकराकडून चिमुकलीवर बलात्कार होत असताना तडफडणाऱ्या चिमुकलीचे पाय आईनेच पकडले. एवढेच नाही, तर तिची किंकाळी शेजाऱ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून तिच्या तोंडावर उशी दाबणारा हातही आईचाच. याच, अत्याचारात चिमुकलीने प्राण सोडले. मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वांनाच हादरवले. पुन्हा एकदा चिमुकले स्वतःच्या घरातही असुरक्षित असल्याचे समोर आले.

अत्याचारांच्या घटनांमध्ये बहुतांश गुन्हे हे जवळच्या, ओळखीच्या व्यक्तींकडून होत असल्याचे समोर आले. मात्र, मालवणीच्या घटनेत आईनेच क्रूरतेचे टोक गाठले. लैंगिक अत्याचार इतका गंभीर होता की चिमुकलीच्या यकृतासह अन्य अवयवांना गंभीर जखमा झाल्या. मुलीचा मृतदेह आणि जखमा पाहून पोलिस अधिकारीही हेलावले. पोलिसांनी चिमुकलीची ३० वर्षीय आई आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकराला अटक केली. प्राथमिक चौकशीदरम्यान प्रियकराची वासना भागविण्यासाठी आईने आपल्या मुलीला पुढे केले, अशी धक्कादायक माहिती पुढे आली.

आरोपी आईला पतीने सोडल्यानंतर ती मुलीसह माहेरी राहत होती. मुलीची आजी धुणीभांडी करते. आरोपी आईचे त्याच परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. रविवारी हे दोघे मुलीसोबत घरी असताना ही घटना घडली. या क्रूर अत्याचारात मुलगी बेशुद्ध पडली. तिचा मृत्यूही झाला. भानावर येताच दोघांनी तिला सरकारी रुग्णालयात नेले. भोवळ येऊन मुलगी पडली, असा बहाणा त्यांनी केला. मात्र, सतर्क सरकारी डॉक्टरांनी मुलीच्या नाजूक भागावरील आणि शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना बोलावून घेतले आणि अत्याचाराला वाचा फुटली.

पोलिस दीदीचा आधार अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिस दीदीकडून शाळा, महाविद्यालयांसह चाळी, सोसायट्यामध्ये चांगल्या-वाईट स्पर्शाचे धडे देण्यात येत आहेत. यातून अनेक गुन्ह्यांना वाचा फुटण्यास मदत झाली. काही घटनांमध्ये वेळीच सतर्क झाल्याने घटनाही टळल्याचे दिसून आले.

याआधीच्या घटनाशिक्षकाकडून अत्याचार खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थ्याला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

वडीलच निघाले विकृत दारूच्या नशेत वडिलांनीच १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवलीत समोर आली आहे. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस