शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाने बाळाला जिवंत पुरले; पालकांनी पैसे न दिल्याच्या रागाने अपहरण करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 06:57 IST

चितकोटे कुटुंबीयांच्या घरात तीन महिन्यांपूर्वी आर्याचा जन्म झाला. आधी एक मुलगा असल्याने दुसरी मुलगी झाली म्हणून कुटुंबीय आनंदात होते. ३ महिन्यांची आर्या आईवडिलांसोबत राहत होती. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जवळच राहणारा तृतीयपंथी कन्नू त्यांच्या घरी धडकला.

मुंबई : चिमुकलीच्या जन्मामुळे कफ परेड येथे राहाणारे चितकोटे कुटुंबीय आनंदात होते. मात्र त्यांच्या या आनंदावर तीन महिन्यातच विरजण पडले. आईवडील मुलीच्या भविष्याची स्वप्ने रंगवत असताना, बाळाला आशीर्वाद दिल्यानंतर पैसे आणि साडी दिली नाही, या रागाने त्याच परिसरात राहणाऱ्या तृतीयपंथीयाने तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करत त्याला खाडीत जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी तृतीयपंथीय कन्हैया चौगुले उर्फ कन्नू (३०) आणि त्याचा साथीदार सोनू कांबळे (२२) यांना अटक केली आहे.

चितकोटे कुटुंबीयांच्या घरात तीन महिन्यांपूर्वी आर्याचा जन्म झाला. आधी एक मुलगा असल्याने दुसरी मुलगी झाली म्हणून कुटुंबीय आनंदात होते. ३ महिन्यांची आर्या आईवडिलांसोबत राहत होती. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जवळच राहणारा तृतीयपंथी कन्नू त्यांच्या घरी धडकला. आशीर्वाद देत त्याने मुलीच्या जन्मानिमित्त एक साडी, नारळ आणि अकराशे रुपयांची मागणी केली. मात्र घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ती मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने चितकोटे कुटुंबीयांनी त्याला नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर कन्नू तेथून निघून गेला.

या कारणावरून रागावलेला कन्नू आपल्या घरी बसला असताना त्याचा मित्र सोनू तेथे गेला. कन्नूने घडलेला प्रकार सांगून आपला अपमान झाल्याचे सोनूला सांगितले. चर्चेअंती दोघांनी चितकोटे कुटुंबीयांना धडा शिकविण्याचे ठरवले. बदला घेण्यासाठी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय दरवाजा उघडा ठेवून झोपले असताना कन्नूने लहानग्या आर्याचे अपहरण केले आणि सोनू कांबळेच्या मदतीने आंबेडकर नगर भागात खाडी परिसरातील दलदलीत बाळाला जिवंत पुरले. काही वेळाने मुलगी घरातून गायब झाल्याचे समजताच चितकाेटे कुटुंबीयांनी कफ परेड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत शोध सुरु केला.

चौकशीच्या वेळी चितकोटे कुटुंबीयांकड़ून कन्नूसोबत घडलेला प्रसंग समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने त्वरित गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे.

मृतदेह ताब्यात खाडीतून मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेमुळे चितकोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कफ परेड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी