शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मुंबई पोलीस झळकले सातासमुद्रापार; ऑस्ट्रेलियन नागरिकाचा लाखो रुपयांचा ऐवज दिला शोधून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 18:51 IST

वनराई आणि कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव सातासमुद्रापार झळकले

ठळक मुद्देमूळचे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले अ‍ॅडम जॅक्सन हे आर्किटेक्ट असून अबूधाबी येथे राहतात.गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळाल्याने अ‍ॅडम जॅक्सन यांनी वनराई व कुलाबा पोलिसांचे आभार मानून मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

मुंबई - वनराई आणि कुलाबा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कामगिरीमुळे मुंबईपोलिसांचे नाव परदेशात गाजले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकाचा गहाळ झालेला लाखो रुपयांचा ऐवज काही तासात या पोलीस पथकांनी शोधून दिला आहे. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई पोलिसांचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार झळकले आहे.मूळचे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेले अ‍ॅडम जॅक्सन हे आर्किटेक्ट असून अबूधाबी येथे राहतात. ते कामानिमित्त गेल्या आठवड्यात भारतात आले होते. गोरेगाव परिसरातील फ्रेन हॉटेल येथे थांबले होते. दरम्यान, अ‍ॅडम हे गेट वे ऑफ इंडिया येथे गेले. तेथून पुन्हा हॉटेलमध्ये येण्यासाठी टॅक्सीत बसले. हॉटेलच्या गेटसमोर अ‍ॅडम टॅक्सीतून उतरले. गडबडीत ते लॅपटॉपची बॅग टॅक्सीत विसरले. बॅगेची आठवण होईपर्यंत टॅक्सी चालक तेथून निघून गेला. अ‍ॅडम यांनी तात्काळ वनराई पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक खरात व पोलीस उपनिरीक्षक शिरवाडकर यांनी अ‍ॅडम यांना तात्काळ बॅग शोधून देण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रकटीकरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत घोणे यांनी पोलीस पथकासह फ्रेन हॉटेल येथे आले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अ‍ॅडम ज्या टॅक्सीतून उतरले त्याचा क्रमांक निदर्शनास आला. त्यानुसार एमएच - 01/ सीआर - 8101 या टॅक्सी क्रमांकावरून वनराई पोलिसांनी टॅक्सीमालक शिवशंकर कांबळे यांचा पत्ता शोधून काढला. ट्रक टर्मिनस येथील राहत्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. मात्र, कांबळे वनराई पोलिसांना भेटले नाही.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत घोणे यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले बॅचमेट सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गावडे यांना घडलेली हकीकत सांगितली. कुलाबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे व वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने अखेर टॅक्सी चालकाचा शोध घेतला. टॅक्सीत विसरलेली अ‍ॅडम यांची काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेत 1500 अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलन 10 लाख 65 हजार रुपये) निकॉन डी810 क्रमांकाचा डीएलएसआर कॅमेरा, निकॉन 70-200 कॅमेरा लेन्स, निकॉन 50 एमएमचे लेन्स, टॅमरॉन 24-70 एमएम कॅमेरा लेन्स, रोस वॉच असा लाखो रुपयांचा मुद्देमाल होता. गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळाल्याने अ‍ॅडम जॅक्सन यांनी वनराई व कुलाबा पोलिसांचे आभार मानून मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईAustraliaआॅस्ट्रेलियाTaxiटॅक्सी