अर्णब गोस्वामींसह त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला बदनामीचा खटला
By पूनम अपराज | Updated: February 3, 2021 20:42 IST2021-02-03T20:42:22+5:302021-02-03T20:42:59+5:30
Defamation suit against Arnab goswami and his wife : अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अर्णब गोस्वामींसह त्यांच्या पत्नीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला बदनामीचा खटला
रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात मुंबईपोलिसांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्या वतीनं पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केल्याचे या याचिकेत म्हटलं आहे. तसेच मुंबई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनीही अर्णब गोस्वामी आणि कुटुंबियांविरोधात अब्रुनुकसानीचा वैयक्तिक दावा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 499, कलम 500 आणि कलम 501 अंतर्गत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मुंबई सत्र न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.
मुंबई - अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीविरोधात अखेर खटला दाखल, मुंबई पोलिसांची सत्र न्यायालयात याचिका #ArnabGoswami#mumbaipolice
— Lokmat (@MiLOKMAT) February 3, 2021