Mumbai police busted sex racket, Bollywood connection exposed | सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, बॉलिवूड कनेक्शन उघड 

सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, बॉलिवूड कनेक्शन उघड 

ठळक मुद्देतिने मोबदला म्हणून १० लाख ५० हजारांची मागणी केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली.

मुंबई - गोरेगावमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देह व्यापार करणारे मोठं रॅकेट चालवले जात होते. त्याचा भांडाफोड मुंबईपोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दलाल म्हणून विवादित अभिनेत्री हा सेक्स रॅकेट चालवत होती. बॉलिवूडच्या ३ अभिनेत्रींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईकरांमध्ये खळबळ उडाली आहे. 

 

गोरेगाव पूर्वेस असणाऱ्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची मुंबई पोलिसांना मिळाली. एक विवादित सहअभिनेत्री तिचे बॉलिवूडशी असलेल्या संबंधांचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना बॉलिवूडशी संबंधित अभिनेत्री वेश्यागमनाकरिता पुरविण्याचे आमिष देऊन पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात सांगून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात होते. त्याप्रमाणे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष - १२ च्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून वेश्या दलाल असलेल्या विवादित अभिनेत्रीशी संपर्क साधून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी बोगस ग्राहकाकडून नमूद वेश्या दलाल विवादित अभिनेत्री ही सिनेसृष्टी आणि टीव्ही सीरियलमध्ये अभिनय करणाऱ्या ३ महिलांना वेश्या व्यवसायासाठी वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पंचतारांकित हॉटेलात घेऊन येणार असल्याची तसेच त्यासाठी तिने मोबदला म्हणून १० लाख ५० हजारांची मागणी केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे कक्ष १२ चे पथकाने सापळा रचून सिनसृष्टीत आणि टीव्ही सीरियलमध्ये अभिनय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला वेश्या दलाल २७ वर्षीय असून तिने हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित असून पीडित तिन्ही महिला या सिनेसृष्टी आणि बॅले डान्स यांच्याशी संबंधित आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३७०, पीटा ऍक्ट कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टीमने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पंचतारांकित हॉटेलमध्ये छापेमारी केली. हिंदी आणि पंजाबी टीव्ही सिरियलमधील अभिनेत्रींना पैशाचे आमिष दाखवून आरोपी वेश्या दलाल ही पंचतारांकित हॉटेलचा उपयोग करून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होती. या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून बालीत महिलांची सुटका करण्याची यशस्वी कामगिरी पोलिसांनी केली आहे. 

Web Title: Mumbai police busted sex racket, Bollywood connection exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.