शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

सुपारी व्यापारी अडकित्त्यात; मुंबई, नागपूरमध्ये ईडीच्या १७ ठिकाणी धाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 7:43 AM

२८९ टन सुपारी जप्त, व्यवहारांच्या केवायसी आणि अन्य व्यवहार तपशिलाची कागदपत्रेही व्यापाऱ्यांना सादर करता आली नाहीत.

मुंबई : दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड कराराचे उल्लंघन करत म्यानमारमार्गे तस्करी करून भारतात आणलेल्या दुय्यम दर्जाच्या सुपारीसाठ्याचा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी मुंबई आणि नागपूर येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी १७ ठिकाणी छापेमारी केली. त्यात साडेअकरा कोटी रुपये मूल्याची २८९ मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली. तसेच १६ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. जप्तीची ही कारवाई नागपुरात झाली. या प्रकरणी तीनच दिवसांपूर्वी ईडीने नागपूरमधील काही सुपारी व्यापाऱ्यांवर छापेमारी केली होती.

या प्रकरणी ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड करारांतर्गत दक्षिण आशियातील निश्चित देशांतून भारतात सुपारी येणे अपेक्षित होते. मात्र, ती तेथून न आणता इंडोनेशिया येथून भारतात आली. परंतु या सुपारीच्या आयातीचे इनव्हॉइस मात्र दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड कराराअंतर्गत केल्याचे दाखवण्यात आले. भारतात सुपारीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्यासंदर्भात मार्च, २०२१ मध्ये सीबीआयकडे तक्रार आली होती. मात्र, या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे दिसून आल्यानंतर ईडीने हा तपास सुरू केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत म्यानमार येथून या सुपारीची तस्करी झाल्याचे दिसून आले. तसेच त्यासंदर्भातील इन्व्हॉयसेस आणि पावत्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. व्यवहारांच्या केवायसी आणि अन्य व्यवहार तपशिलाची कागदपत्रेही व्यापाऱ्यांना सादर करता आली नाहीत. ही सुपारी तस्करी करून आणल्यामुळे या प्रकरणी करचोरी झाल्याचेही निदर्शनास आले आहे. तस्करी करून भारतात आलेल्या या सुपारीच्या साठ्याचे प्रामुख्याने वितरण हे महाराष्ट्रात नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात झाले असल्याचे समजते.

दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड करार काय आहे?भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदिव आणि श्रीलंका या देशांचा एक समूह असून काही विशिष्ट कृषी उत्पादनांचे व्यवहार या देशांनी आपापसात करणे अपेक्षित आहे. याकरिता दक्षिण आशिया प्रेफरन्शिअल ट्रेड करार करण्यात आला आहे. सुपारी या घटकाचादेखील याच कराराअंतर्गत व्यवहार होणे अपेक्षित आहे.

सुपारी तस्करीचे मोठे जाळेसुपारी तस्करीचे हे मोठे जाळे असल्याचा ईडीला संशय आहे. व्यापारी, दलाल, मध्यस्थ, तस्कर, वाहतूक व्यापारी, हवाला ऑपरेटर अशी एक मोठी साखळी असून यामध्ये काही सरकारी अधिकारीदेखील गुंतले असल्याचा ईडीला संशय असून त्याअनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय