शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आई आली उदरनिर्वाहासाठी अन् बालिकेचे झाले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 18:57 IST

या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देदोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ठाणे रेल्वे स्थानकात गुरुवारी घडली. तिने कोपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. रात्री जेवण केल्यानंतर दोन मुलांना घेऊन ती फलाट क्रमांक दहाबाहेर झोपी गेली.

ठाणे - आपल्या आईसमवेत जालन्यातून ठाण्यात आलेल्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना ठाणेरेल्वे स्थानकात गुरुवारी घडली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.जालना जिल्ह्यातील कुंभार-पिंपळगाव येथे राहणारी ३५ वर्षीय यमुना रोहित नरवडे हिचा नवरा काहीच कामकाज करत नाही. त्यामुळे रोजीरोटी कमविण्यासाठी तिने २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस पकडली. २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता ती ठाण्यात उतरली. या वेळी तिच्यासोबत पाच वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षीय मुलगी होती. ठाण्यात आल्यानंतर ती दिवसभर रेल्वे स्थानकातच बसून होती. रात्री जेवण केल्यानंतर दोन मुलांना घेऊन ती फलाट क्रमांक दहाबाहेर झोपी गेली.उत्तररात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्यांना पोलिसांनी उठवून, येथे झोपू नका, असे सांगितले. परंतु त्यांच्याकडे दुसरीकडे निवारा नसल्याने पोलीस गेल्यावर ती पुन्हा मुलांना घेऊन झोपी गेली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिला जाग आली, तेव्हा मुलगी तेथे नसल्याचे उघड झाले. त्यानुसार तिने कोपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

टॅग्स :Kidnappingअपहरणthaneठाणेrailwayरेल्वेPoliceपोलिसJalanaजालना