वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येईना; पतीनं तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:41 IST2022-01-13T15:41:06+5:302022-01-13T15:41:23+5:30

माहेरी गेलेली पत्नी घरी परतत नसल्यानं संतापलेल्या पतीचं धक्कादायक कृत्य

in mumbai Husband Posts Objectionable Video Clip Of Wife On Mobile Status | वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येईना; पतीनं तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला

वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येईना; पतीनं तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला

मुंबई: वारंवार बोलावूनही माहेरी गेलेली पत्नी घरी परतत नसल्यानं संतापलेल्या पतीनं तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पाहिल्याची माहिती मिळताच पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदिवलीत राहणाऱ्या २८ वर्षीय व्यक्तीचा तरुणीचा विवाह २०१५ मध्ये भिवंडीतील तरुणाशी झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पती, सासू, सासरे, नणंदेनं तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. त्रासाला कंटाळून तरुणी माहेरी निघून आली. मात्र पतीनं तिची समजूत काढून तिला घरी आणलं. काही दिवसांनी त्यांना जुळी मुलं झाली. त्यानंतरही सासरच्यांकडून होणारा छळ सुरूच होता. त्यामुळे महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरण न्यायालयात गेलं. सामोपचारानं प्रकरण मिटलं. त्यानंतर दाम्पत्यानं स्वतंत्र घर घेतलं.

पतीनं पुन्हा छळ सुरू केल्यानं पत्नी माहेरी निघून गेली. तिनं घरी परतावं यासाठी तरुणाचे प्रयत्न सुरू होते. पण वारंवार होणाऱ्या त्रासाला महिला कंटाळली होती. पत्नी घरी येत नसल्यानं पती संतापला. त्यानं छुप्या पद्धतीनं काढलेला तिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला. नातेवाईक आणि मित्र मंडळींनी हा व्हिडीओ पाहिला. याची माहिती मिळताच पत्नीनं पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Web Title: in mumbai Husband Posts Objectionable Video Clip Of Wife On Mobile Status