शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरनं ऑनलाईन समोसे मागवले, एक चूक केली...; खात्यातून दीड लाख उडाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 23:45 IST

ही घटना महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आहे. येथील एका 27 वर्षीय डॉक्टरने आपल्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी एक रेस्टोरन्टमधून 25 समोसे ऑनलाइन ऑर्डर केले होते

ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सोपी झाली असली तरी, तिचे धोकेही वारंवार समोर येत असतात आणि लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात. असाच काहीसा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. येथे एका डॉक्टरने 25 समोसे ऑनलाइन ऑर्डर केले होते. मात्र, डॉक्टरकडून एक अशी चूक झाली की, समोस्यांच्या पैशांसोबतच त्यांच्या खात्यातून तब्बल 1.40 लाख रुपये उडाले. जेव्हा या डॉक्टरला बँकेतून मेसेज आले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आहे. येथील एका 27 वर्षीय डॉक्टरने आपल्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी एक रेस्टोरन्टमधून 25 समोसे ऑनलाइन ऑर्डर केले होते. ऑर्डर केल्यानंतर, त्यांच्या खात्यातून समोस्यांचे बील म्हणून 1500 रुपये कापले गेले. त्यांच्या खात्यातून पैसे कटताच सायबर ठग सक्रिय झाले. संबंधित डॉक्टरला लगेचच एक कॉल आला आणि सांगण्यात आले की, आम्हाला अद्याप पेमेंट मिळाले नाही.

...अन् सुरू झाले बँकेचे मेसेज -समोरून सांगण्यात आले की, दुसऱ्या क्रमांकावर आमची पेमेंट रिक्वेट एक्सेप्ट करा. एक लिंक पाठवण्यात येत आहे. डॉक्टरनेही ओके म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा पैसे पाठवण्याची तयारी दाखवली. येथेच डॉक्टर चुकला. यानंतर, डॉक्टरने त्या लिंकवर पेमेंट केले तर त्याच्या अकाउंटवरून आधी 28 हजार रुपये कटले आणि नंतर, दना-दन मैसेज यायला सुरुवात झाली. यानंत थोड्याच वेळात, आपल्या अकाउंटवरून दीड लाख रुपये उडाल्याचे डॉक्टरच्या निदर्शनास आले. 

संबंधित डॉक्टरने आपले बैंक अकाउंट ब्लॉक करेपर्यंत त्यांच्या खात्यातून 1.40 लाख रुपये उडाले होते. यानंतर डॉक्टरने तत्काल मुंबईपोलिसांत सायबर गुन्ह्या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना गेल्या शनिवारी घडली. 

टॅग्स :Mumbaiमुंबईcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdoctorडॉक्टर