शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 19:52 IST

आरोपींना होवू शकते १० वर्षापर्यंत शिक्षा, गुन्ह्यात बदल

ठळक मुद्दे६ जणांचा मृत्यूप्रकरणी संबंधिताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होतात्यांना १० वर्षाची शिक्षा होवू शकते. आरोपींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. हा जामिनपात्र गुन्हा होता. 

मनीषा म्हात्रे

मुंबई -  सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यूप्रकरणी संबंधिताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होता. आता संबंधित प्रशासन, अधिकारी, ठेकेदारास पोलिसांनी मृत्यूस जबाबदार धरत, गुन्ह्यांत बदल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध ३०४ अंतर्गत कारवाई होणार आहे. त्यात त्यांना १० वर्षाची शिक्षा होवू शकते. 

अंजुमन इस्लाम कॉलेज येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा दादाभाई नौरोजी मार्गावरील या पादचारी पूलाचा  भाग  कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ६ जणांना प्राण गमवावा लागला, तर ३१ जण जखमी झाले आहेत. घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या आझाद मैदान पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा याप्रकरणी पादचारी पूलाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी जबाबदार संबंधीत यंत्रणा, संस्था आणि त्याच्यासंबंधीत सर्व पदाधिकारी, व्यक्तींविरोधात भादंवी कलम ३०४ (अ), 337 आणि 338 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आरोपींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. हा जामिनपात्र गुन्हा होता. 

मात्र आता, आरोपींवर ३०४ अंतर्गत कारवाई होणार आहे. यातील आरोपीच ६ जणांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या गुन्ह्यांत बदल करण्यात आले आहेत. हा अजामिनपात्र गुन्हा असून, यात दोषींना १० वर्षापर्यंत शिक्षा होवू शकते.

तसेच पोलिसांनी पुलाचे स्ट्रक्चर आॅडीट, वर्क आॅर्डर तसेच पुला संबंधित कागदपत्रांवरुन यात कुणाची काय जबाबदारी होती? त्यानुसार, तपास सुरु केला आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता संजय दराढे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेत, यातील जखमींचेही जबाब पोलीस नोंदवत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात, लवकरच अटकेची कारवाई होवू शकते असेही पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूलCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाCrime Newsगुन्हेगारी