शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Mumbai Cruise Rave Party Case, Aryan Khan: जामीन सुनावणीपूर्वी आर्यनच्या मनगटात दिसलं काळ्या मण्याचं ब्रेसलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 12:29 IST

Mumbai Cruise Rave Party Case, Aryan Khan: आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत आहे. त्यामुळे, आज आर्यनला जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तत्पूर्वी आर्यनच्या हातात काळ्या मणीचे ब्रेसलेट दिसून आले.

ठळक मुद्देआर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत आहे. त्यामुळे, आज आर्यनला जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तत्पूर्वी आर्यनच्या हातात काळ्या मणीचे ब्रासलेट दिसून आले.

मुंबई - श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. मात्र, अंधश्रद्धा बाळगल्यास तो चर्चेचा विषय ठरतो. विशेष म्हणजे संकटसमयी माणूस अनेकदा अंधश्रद्धेला बळी पडतो. पौराणिक आणि अध्यात्मिकतेकडे तो वळला जातो, असे सांगण्यात येते. सध्या, क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानकडे पाहिल्यास अशीच शंका व्यक्त होत आहे. कारण, आर्यनच्या जामीनावर आज सुनावणी होत आहे. तत्पूर्वी त्याने हाताच्या मनगटात काळ्या मण्याचे ब्रेसलेट घातल्याचे दिसून आले.  

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होत आहे. त्यामुळे, आज आर्यनला जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तत्पूर्वी आर्यनच्या हातात काळ्या मणीचे ब्रासलेट दिसून आले. त्यामुळे, शुभ संकेताचे हे प्रतिक मानून आर्यनने ते परिधान केल्याची चर्चा आहे. कारण, यापूर्वी आर्यनच्या हातात कधीही तसे ब्रासलेट दिसले नव्हते. काळ्या मण्याचे ब्रासलेट हे संरक्षणाचे प्रतिक मानले जाते, वाईट आणि नकारात्मक विचारांपासूनही ते व्यक्तीला दूर ठेवते. या ब्रेसलेटला अध्यात्मिक महत्त्व असून ते भावनांना स्थीर ठेवण्यास मदत करते. 

प्रतिकूल परिस्थितीत आशावादी आणि संकटकाळात सकारात्मकता निर्माण करण्याचं कामही काळ्या मण्यांमुळे होतं, असे मानन्यात येते. त्यामुळे, आर्यन खानने परिधान केलेले हे ब्रासलेट त्याच भावनेतून केले असावे, अशी चर्चा रंगत आहे.  

आईच्या जन्मदिनीच मिळणार जामीन?

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्स पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला शाहरूख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) काल गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यादरम्यान आरोपींना कारागृहात न पाठवता एक दिवस एनसीबी कोठडीतच ठेवण्याची विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली आणि न्यायालयाने ती मान्यही केली. त्यानंतर आज आर्यनच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आज आर्यनची आई गौरी खान  (Gauri Khan) हिचा वाढदिवस. त्यामुळे आईच्या वाढदिवशी आर्यन तुरूंगातून बाहेर येतो की तुरुंगातील त्याचा मुक्काम आणखी वाढतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जामीन अर्जावर सुनावणीस सुरुवात

कालच्या सुनावणीत एनसीबीने कोर्टाकडे आर्यन व त्याच्या दोन साथीदारांची कोठडी 11 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तथापि न्यायमूर्ती आर एम नेर्लीकर यांनी कोठडी वाढवण्याची मागणी करणारी एनसीबीची याचिका फेटाळून लावली. आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जेंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याच्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच जणांना दुस-या दिवशी अटक करण्यात आली होती.  

१६ जणांना अटक

या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन साहू अशी या नव्या आरोपींची नावे असून त्यांना मंगळवारी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले.  त्यांना 11 ऑक्टोबररपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आठ जणांमध्ये आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखीही काही लोक ड्रग्स घेत असल्यासंदर्भात तपास केला जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्री एनसीबीनं मुंबईतील गोरेगाव परिसरात धाड टाकली होती. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीCourtन्यायालयMumbaiमुंबईNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो