Mumbai Cruise Rave Party: मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपविलेले; खळबळजनक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 10:24 PM2021-10-09T22:24:20+5:302021-10-09T22:43:29+5:30

Munmun Dhamecha drug on Cruise: एनसीबीने 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर छापा मारला आणि मुंबई, बॉलिवूड ते दिल्लीपर्यंत मोठी खळबळ उडाली होती. या रेव्ह पार्टीत ड्रग्ज कसे कसे नेले गेले आणि कुठे कुठे सापडले याचे धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.

Mumbai Cruise Rave Party, Aryan khan: munmun dhamecha carry drugs in Sanitary pad, Video Viral | Mumbai Cruise Rave Party: मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपविलेले; खळबळजनक Video व्हायरल

Mumbai Cruise Rave Party: मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपविलेले; खळबळजनक Video व्हायरल

googlenewsNext

एनसीबीने 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर छापा मारला आणि मुंबई, बॉलिवूड ते दिल्लीपर्यंत मोठी खळबळ उडाली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि हिरोईन व अन्य तरुण तरुणी रेव्ह पार्टी करत होते. आर्यनसोबत त्याचा मित्र अरबाज खान आणि मुनमुन धमेचाला (munmun dhamecha) देखील एनसीबीने ताब्यात घेतले होते. यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती. या रेव्ह पार्टीत ड्रग्ज कसे कसे नेले गेले आणि कुठे कुठे सापडले याचे धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. (munmun dhamecha carry drugs.)



 

अरबाजने त्याच्या बुटात ड्रग्ज ठेवलेले तर मुमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमधून (Sanitary pad) ड्रग्ज क्रूझवर नेले होते. एनसीबीने (NCB) ती त्या रुममध्ये होती तिथे तिच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आल्याचे सांगितले होते. हे ड्रग्ज तिने सॅनिटरी पॅडमधून नेल्याचे सांगण्यात आले होते. आता सोशल मीडियावर क्रूझवरील मुनमुन धमेचाच्या खोलीतून ड्रग्ज सापडलेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुणी (अधिकारी असण्याची शक्यता) सॅनिटरी पॅड रुममधील कार्पेटवर ठेवून त्यातून ड्रगची गोळी बाहेर काढताना दिसत आहे. 

मुनमुन धमेचाच्या वकिलांनी मुनमुनकडे ड्रग नव्हते असा दावा केला आहे. मुनमुन त्या खोलीत जाण्याआधी काही जण तिथे होते. ती तिथे गेली आणि एनसीबीचे अधिकारी आले, त्यांनी त्या खोलीतील कार्पेटवर पडलेले ड्रग मुनमुनचे असल्याचे सांगत तिला अटक केल्याचा आरोप केला होता. हा व्हिडीओ काहीसा तसाच आहे. परंतू यामध्ये ना मुनमुन दिसत आहे ना त्या अधिकारी महिलेचा चेहरा. यामुळे हा व्हिडीओ क्रूझ रेव्ह पार्टीतील आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, पोस्ट करणाऱ्याने हा दावा केला आहे. मुनमुनच्या भावाने हे सारे खोटे असल्याचे म्हटले आहे. 
 

Web Title: Mumbai Cruise Rave Party, Aryan khan: munmun dhamecha carry drugs in Sanitary pad, Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.