अखेर कतारमधील भारतीय कपलची ड्रग केसमधून सुटका, ज्या काकूने हनीमूनला पाठवलं तिच निघाली गुन्हेगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:46 AM2021-03-31T11:46:51+5:302021-03-31T11:54:50+5:30

आता त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं आहे. कतारमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, लवकरच कपल मुंबईत परतेल.

Mumbai couple sentenced 10 year jail in Qatar term cleared of all charges will returned soon | अखेर कतारमधील भारतीय कपलची ड्रग केसमधून सुटका, ज्या काकूने हनीमूनला पाठवलं तिच निघाली गुन्हेगार!

अखेर कतारमधील भारतीय कपलची ड्रग केसमधून सुटका, ज्या काकूने हनीमूनला पाठवलं तिच निघाली गुन्हेगार!

Next

मुंबईतील कपल ओनिबा आणि शारिक कुरेशी कतारमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना ड्रग केसमध्ये अटक करण्यात आली. ड्रग बाळगल्याप्रकरणी २०१९ मध्ये त्यांना कतारमध्येच १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. इतकेच नाही तर त्यांना १ कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडही ठोठावण्यात आला होता. आता त्यांना सर्व आरोपांमधून मुक्त करण्यात आलं आहे. कतारमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, लवकरच कपल मुंबईत परतेल.

theprint.in ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील या कपलला इंटरनॅशनल एअरपोर्टवरून जुलै २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्या बॅगमध्ये अधिकाऱ्यांना ४.१ किलोग्रॅम हशिश ड्रग आढळलं होतं. शारिकची काकू तबस्सुम कुरेशीने दोघांना हनीमूनला पाठवलं होतं. हा त्यांचा दुसरा हनीमून होता. पण त्यांच्याकडे ड्रग आढळल्याने त्यांना अटक झाली. त्यामुळे हे कपल गेल्या २ वर्षांपासून कतारमधील तुरूंगात होतं आणि तिथेच महिलेने बाळालाही जन्म दिला. 

पकडली गेली काकू

या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घरातील लोकांना तबस्सुमचा मोबाइल सापडला. या मोबाइलमध्ये तबस्सुम आणि ड्रग तस्करांमधील संवादाचे रेकॉर्डींग होते. घरातील लोकांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तबस्सुमला लगेच अटक केली. तब्बसुमला एनसीबीने अटक केली आणि तिची चौकशी केली. त्यानंतर तिच्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाला. शारिकचे वडील शरीफ कुरेशी हे १५ महिन्यांपर्यंत कतारमध्ये राहिले आणि या कपलसाठी त्यांनी वकिल केला. कोर्टाने कपलला १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कपलने कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील केलं.

शिक्षा कशी झाली माफ?

२७ जानेवारी २००२० ला कोर्टाने कपलची याचिका फेटाळली. जानेवारी २०२१ मध्ये गुन्हे विभागाच्या कोर्टाने कपलच्या वकीलाने सादर केलेल्या कागदपत्रांची आणि सुनावणीची समीक्षा केली. पुढील महिन्यात त्यांची याचिका स्वीकारली गेली आणि शिक्षा रोखली गेली. या याचिकेत आढळलं की, कोर्टाचा निर्णय दोषपूर्ण होता. कोर्टाने सांगितले की, कपलने मुद्दामहून हे केलं नाही.

त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. त्यांना हे माहीत नव्हतं की, त्यांच्याकडे काकूने दिलेल्या पार्सलमध्ये ड्रग आहे. हे ड्रग त्याच्या काकूने त्यांच्याकडे दिलं होतं. काकूने एक पॅकेट कतारमधील मित्रांला देण्यासाठी दिलं होतं. त्यात तंबाखू असल्याचं तिने सांगितलं होतं.
 

Web Title: Mumbai couple sentenced 10 year jail in Qatar term cleared of all charges will returned soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.