शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भरदिवसा 'मुळशी पॅटर्न'फेम थरार! रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 21:38 IST

एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी एकजण ताब्यात

पुणे (धनकवडी) : बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी अकराच्या सुमारास ऐन वर्दळीच्या वेळी घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सलीम मेहबूब शेख, वय २४ वर्षे असे मृत व्यक्ती चे नाव आहे तर या हल्ल्यात तोहफिक शेख, वय २७ वर्षे जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून हा खून पुर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी व मृत यांच्यामध्ये पुर्वी पासून वाद होते. आज सकाळीही त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडली. मृत व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. अनेकदा ते मद्यपान करण्यास एकत्र बसत होते. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. सलीम व तोहफिक मुख्य रस्त्यापासून आतल्या रस्त्याकडे जात असताना आरोपी अचानक त्यांच्यामागून आला. त्याने दोघांनाही काही समजायच्या आतच पालघनसारख्या हत्याराने त्यांच्यावर वार केले. हे वार वर्मी लागल्याने सलीमचा जागेवरच मृत्यू झाला तर तोहफिकला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालया त दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे दाखल झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसArrestअटकBibvewadiबिबवेवाडी